आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या 25.60 कोटींपेक्षा अधिक मात्रा पुरवण्यात आल्या
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1.17 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2021 11:22AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा मोफत पुरवत आहे. चाचणी, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारे वर्तन यासह लसीकरण हा सुद्धा महामारी प्रतिबंध आणि व्यवस्थापन धोरणाचा अविभाज्य भाग आहे.
कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील व्यापक आणि गतिशील धोरणाला 1 मे 2021पासून सुरुवात झाली.
या धोरणाअंतर्गत, प्रत्येक महिन्यात कोणत्याही उत्पादकाच्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेने (सीडीएल) मान्यता दिलेल्या 50 टक्के लसीच्या मात्रा केंद्र सरकार खरेदी करेल. आधीप्रमाणेच राज्य सरकारांना या मात्रा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील.
केंद्र सरकारकडून मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत 25.60 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा (25,,60,08,080) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या आहेत.
आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार,वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 24,44,06,096 मात्रा देण्यात आल्या आहेत.
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1.17 कोटींपेक्षा जास्त (1,17,56,911) मात्रांचा साठा उपलब्ध आहे.
याशिवाय येत्या 3 दिवसात 38 लाखापेक्षा अधिक (38,21,170) लसीच्या मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना प्राप्त होतील.
***
SonalT/SushmaK/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1726181)
आगंतुक पटल : 204
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada