पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

एलपीजी ग्राहकांसाठी रिफिल बुकिंग पोर्टेबिलिटी सुविधा


पुणे आणि इतर काही शहरात लवकरच ही अनोखी सुविधा उपलब्ध होणार

Posted On: 10 JUN 2021 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जून 2021

 

एलपीजी ग्राहकांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आणि सर्वांना परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टीकोनातून, एलपीजी ग्राहकांना कोणत्या वितरकांकडून एलपीजी सिलिंडर पुन्हा भरून हवा आहे याची निवड ग्राहकांनी करण्यासंदर्भातील  निर्णय  घेण्यात आला आहे. तेल विपणन कंपनी (ओएमसी) मधील पत्त्यासह असलेल्या   वितरकांच्या यादीमधून ग्राहकांना त्यांचा “वितरण  वितरक” निवडता येईल. प्रायोगिक तत्वावर लवकरच चंडीगढ , कोयम्बतूर , गुडगाव, पुणे आणि रांची येथे ही अनोखी सुविधा उपलब्ध होणार आहे.  

नोंदणीकृत लॉग इन  वापरुन मोबाईल अ‍ॅप / ग्राहक पोर्टलवर एलपीजी सिलिंडर पुन्हा भरून घेण्यासाठी नोंदणी करताना वितरणाच्या वितरकांची  यादी त्यांच्या कामगिरी क्रमवारीसह दर्शविली जाईल.

 

डिजिटल एलपीजी सेवा

तंत्रज्ञानाचा लाभ घेत ,ग्राहकांना डिजिटल मंचाद्वारे ,एलपीजी सिलिंडर भरण्यासाठी नोंदणी आणि पैसे भरण्यास मदत करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी  खालील डिजिटल उपक्रम स्वीकारले आहेत:

Mode

Indane

Bharat Gas

HPGas

Portal and Mobile App: Customers can book refill, update personal records, apply for portability, transfer of connection, address change and all other refill related services.

https://cx.indianoil.in and IndianOil One mobile app

https://my.ebharatgas.com and Hello BPCL mobile app

https://myhpgas.in and HP Pay mobile app

 

Refill Booking through IVRS and SMS number:

 

77189 55555

7715012345 / 7718012345

List of state wise telephone numbers- https://www.hindustanpetroleum.com/hpanytime

Refill Booking through Missed Call

84549 55555

7710955555

9493602222

WhatsApp

75888 88824

1800224344

9222201122

 

उपरोक्त डिजिटल व्यवस्थे व्यतिरिक्त, ग्राहक उमंग (युनिफाइड मोबाइल अॅप फॉर न्यू गव्हर्नन्स) अ‍ॅप किंवा भारत बिल पे सिस्टम अ‍ॅप्स आणि मंचाद्वारे त्यांचे एलपीजी सिलिंडर भरून घेण्यासाठी नोंदणी करू शकतात. याव्यतिरिक्त ग्राहक त्यांच्या ई-कॉमर्स अॅप्सद्वारे सिलिंडर भरून घेण्यासाठी नोंदणी करू शकतात आणि पैसे भरू शकतात. उदा. ऍमेझॉन , पेटीएम इ.

 

एलपीजी ग्राहकांसाठी एलपीजी जोडणी पोर्टेबिलिटी

त्याच भागात सेवा देणार्‍या दुसर्‍या वितरकाकडे  एलपीजी जोडणीचे ऑनलाईन हस्तांतरण करण्याची सुविधा एलपीजी ग्राहकांना संबंधित तेल विपणन कंपन्यांचे  वेब-पोर्टल तसेच त्यांच्या मोबाइल अॅप्सद्वारे प्रदान करण्यात आली आहे.

नोंदणीकृत लॉग इन वापरून ग्राहकांना त्यांच्या क्षेत्रातील  वितरकांच्या यादीमधून त्यांच्या तेल विपणन कंपनीचा  वितरक निवडता येईल आणि ग्राहकांना त्यांच्या  एलपीजी जोडणीचा वितरक बदलून घेण्यासाठी पर्याय मिळेल  

ही सुविधा विनामूल्य आहे आणि या सुविधेसाठी कोणतेही शुल्क किंवा हस्तांतरण  शुल्क देय नाही. मे, 2021 मध्ये 55759 पोर्टेबिलिटी विनंत्या तेल विपणन कंपन्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1725991) Visitor Counter : 238