माहिती आणि प्रसारण मंत्रालय

राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकांच्या प्रसिद्धीसाठी मनोरंजन वाहिन्यांकरता मार्गदर्शक सूचना

Posted On: 03 JUN 2021 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2021

 

माहिती प्रसारण मंत्रालयाने आज सर्व खाजगी मनोरंजन वाहिन्यांसाठी (बिगर वृत्तवाहिन्या) राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकांच्या जनजागृतीसाठी मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या. यानुसार वाहिन्यांनी आपल्या कार्यक्रमांदरम्यान, विशेषत: प्राईम टाईममध्ये टिकर किंवा शक्य त्या माध्यमातून खालील हेल्पलाइन क्रमांकांची जनजागृती करायची आहे.

1075

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा हेल्पलाइन क्रमांक

1098

महिला आणि बालविकास मंत्रालयाचा हेल्पलाइन क्रमांक

14567

ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा हेल्पलाइन क्रमांक ( दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड )

 

08046110007

मानसिक आधारासाठी NIMHANS यांचा हेल्पलाइन क्रमांक

14443

आयुष कोविड -19 समुपदेशन हेल्पलाइन क्रमांक

9013151515

MyGovWhatsApp हेल्पडेस्क

 

नागरिकांना लाभ व्हावा यासाठी सरकारने हे हेल्पलाईन क्रमांक तयार केले असून त्याचा प्रचार केला जात आहे.

कोविड उपचाराबाबतची माहिती, कोविड प्रतिबंधक वर्तन आणि लसीकरण याबाबत सरकारने गेल्या काही महिन्यांपासून विविध माध्यमातून जनजागृती केली आहे. यात मुद्रीत माध्यमे, दूरचित्रवाणी, रेडीओ, सोशल मिडिया यांचा समावेश आहे.

यानुसार, महामारी विरोधातल्या तीन महत्वाच्या मुद्यांबाबत जनजागृती करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे श्रेय खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनाही जाते. यापुढेही राष्ट्रीय पातळीवरच्या चार हेल्पलाइन क्रमांकांची जनजागृती करण्यासाठी प्रसिद्धीचे काम करावे असा सल्ला खाजगी मनोरंजन वाहिन्यांना ( बिगर वृत्तवाहिन्या) देण्यात आला आहे.

M.Chopade/V.Ghode/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1724130) Visitor Counter : 234