शिक्षण मंत्रालय
शिक्षक पात्रता परिक्षा प्रमाणपत्राचा कालावधी सात वर्षांहून वाढवून आजीवन - केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक
Posted On:
03 JUN 2021 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2021
केंद्र सरकारने, शिक्षक पात्रता परिक्षा प्रमाणपत्राचा कालावधी सात वर्षांहून वाढवून आजीवन करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. हा निर्णय 2011 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल.
सात वर्षांचा कालावधी समाप्त झाला आहे अशा उमेदवारांसाठी नवे शिक्षक पात्रता परिक्षा प्रमाणपत्र पुन्हा वैध करणे किंवा नव्याने उपलब्ध करणे ही कार्यवाही संबंधित राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश करतील असे त्यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रात कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दृष्टिने हे सकारात्मक पाऊल असल्याचे पोखरियाल म्हणाले.
शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी शिक्षक पात्रता परिक्षा प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
S.Tupe/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724049)
Read this release in:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada