वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सार्वजनिक खरेदी पोर्टल जीईएमवर अधिक भागीदारांचा सहभाग वाढवण्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन
रेल्वेच्या ई-खरेदी प्रक्रियेशी जीईएमला जोडल्याने मोठी बचत होईल - केंद्रीय मंत्री पियुष गोयल
Posted On:
01 JUN 2021 7:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2021
ई-बाजारपेठ असलेल्या जीईएमने आपला विस्तार करावा आणि उत्पादने तसेच सेवांच्या खरेदीसाठी आपल्या पोर्टलवर अधिकाधिक भागीदारांचा सहभाग वाढवावा असे आवाहन रेल्वे आणि वाणिज्य तसेच उद्योग व ग्राहक कार्य आणि अन्न व सार्वजनिक पुरवठा मंत्री पियुष गोयल यांनी आज केले. सर्व राज्ये आणि केन्द्राच्याच कार्यालये तसेच सार्वजनिक प्रतिष्ठानांसाठीच एका छताखाली सर्व काही इतकीच मर्यादा याला घालू नये तर लघू आणि मध्यम उद्योगांनाही आपली उत्पादने दाखवण्याची संधी द्यावी असे ते म्हणाले. जीईएएम आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी ते चर्चा करत होते. जीईएम पूर्णपणे कागदरहीत, रोख रहित अशी ई बाजारपेठ प्रणाली आहे. तिच्या कामगिरीबद्दल गोयल यांनी प्रशंसा केली. समान उपयोगाच्या उत्पादने आणि सेवांची खरेदी इथे समोरासमोर आल्याशिवाय केली जाऊ शकते. पंतप्रधानांना या पोर्टलकडून खूप अपेक्षा आहेत, पोर्टलला त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, विक्रेत्यांच्या गटबाजीबाबत पोर्टलने सावध राहायला हवे असे ते म्हणाले.
खरेदीदारांसाठी, एकात्मिक खरेदी व्यवस्था उभारण्याकरता रेल्वेच्या ई खरेदी प्रक्रीयेशी जीईएमला त्वरेने जोडण्यावर गोयल यांनी भर दिला. यामुळे सार्वजनिक खर्चात मोठी बचत होईल असे ते म्हणाले. पेट्रोलियम आणि पोलाद उद्योगाकडून मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी ही पायाभरणी ठरेल असा विश्वासही मंत्री महोदयांनी व्यक्त केला.
जीईएमचा मोठा प्रभाव राहिला असून त्याची व्यापकता वाढली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मधे यावरची खरेदीची मागणी 38620 कोटी रुपयांवर पोहचली. यावर 52 हजारापेक्षा अधिक खरेदीदारांनी तर 18.75 लाखापेक्षा जास्त विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. पोर्टलवर 16,332 उत्पादने तर 187 सेवांबाबत व्यवहार होत आहे.
कोविड -19 श्रेणीमधे मार्च 20 ते मे 21 या कालावधीत 7863 कोटी रुपये खरेदीची मागणी राहिली. यात 268 कोटी रुपये किंमतीच्या ऑक्सिजन कॉन्सर्टेटर्सचा समावेश आहे.
खरेदीदार आणि विक्रेते यांची मते, प्रतिक्रीया जाणून घेतल्यावर काही महत्वाच्या सुविधा आणि कार्यपद्धतींचा समावेश केला आहे.
* * *
S.Tupe/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723510)
Visitor Counter : 172