PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
31 MAY 2021 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 31 मे 2021




आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
भारतात दैनंदिन नव्या रुग्ण संख्येचा घटता कल जारी राखत 1.52 लाख या गेल्या 50 दिवसातल्या सर्वात कमी दैनंदिन नव्या रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.
सलग चौथ्या दिवशी देशात 2 लाखापेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात 1,52,734 नव्या रुग्णांची नोंद झाली.
भारतात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून ही संख्या आज 20,26,092 झाली आहे.
गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्णसंख्येत 88,416 ने घट झाली असून उपचाराधीन रुग्ण, देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 7.22% आहेत.
सलग 18 व्या दिवशी, दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 2,38,022 रुग्ण बरे झाले.
महामारीच्या सुरवातीपासूनच्या कोरोना बाधितामधून 2,56,92,342 लोक कोरोनातून बरे झाले असून गेल्या 24 तासात 2,38,022 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर 91.60% झाला आहे.
गेल्या 24 तासात 16,83,135 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत 34.48 कोटी चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या संख्येत वाढ होत असतानाच साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दरामध्ये सातत्याने घट होत आहे. साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 9.04% असून दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर आज 9.07 % आहे. सलग 7 व्या दिवशी हा दर 10 % पेक्षा कमी आहे.
राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत आतापर्यंत 21.3 कोटी पेक्षा जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 30,28,295 सत्राद्वारे एकूण 21,31,54,129 मात्रा देण्यात आल्या.
इतर अपडेट्स :
महाराष्ट्र अपडेट्स :-
महाराष्ट्र सरकारने 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका-बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई,वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक मध्ये 15 जून पर्यंत टाळेबंदी वाढवली आहे. ज्या शहरी भागात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेऐवजी सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येतील. सर्व शासकीय कार्यालये ही 15 ऐवजी 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. रविवारी महाराष्ट्रात कोविड-19 बाधित रूग्णसंख्या 18600 होती तर बाधितांची एकूण संख्या 5,731,815 वर पोहचली आहे. तर 402 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात एकूण बळींची संख्या 94,844 झाली आहे.
गोवा अपडेट्स:-
गोव्यात रविवारी 645 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली तर 28 मृत्यू झाले.एकूण बाधितांची संख्या 1,55,064 झाली तर एकूण 2,625 मृत्यू नोंद आहेत.

M.Chopade/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1723230)
Visitor Counter : 182