आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 23 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा प्रदान


राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे 1.75 कोटी पेक्षा अधिक लसींच्या मात्रा उपलब्ध

Posted On: 31 MAY 2021 10:58AM by PIB Mumbai

देशभरातील लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणूनकेंद्र सरकारराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींच्या मात्रा विनामूल्य  उपलब्ध करून सहाय्य करत आहे. याव्यतिरिक्तकेंद्र  सरकार हे  राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या मात्रांची  थेट खरेदी करण्याची सुविधाही सुलभ करत आहे. लसीकरण ,चाचणीमागोवाउपचार आणि कोविड योग्य वर्तन यासह या महामारीच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक रणनीतीचा अविभाज्य स्तंभ आहेत .

 कोविड -19 लसीकरणाच्या व्यापक आणि गतिशील अशा तिसऱ्या टप्प्याच्या रणनीतीची अंमलबजावणी दिनांक 1 मे 2021 पासून सुरू झाली आहे.

 या धोरणानुसारप्रत्येक महिन्यात कोणत्याही उत्पादकाच्या केंद्रीय औषधी प्रयोगशाळेने  (सीडीएल) मान्यता दिलेल्या एकूण लसींच्या मात्रांपैकी  50% मात्रा  सरकारकडून खरेदी केल्या जातील. केंद्र सरकार पूर्वीप्रमाणे  या लसींच्या मात्रा राज्य सरकारांना  पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करुन देईल.

 केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 23  कोटीपेक्षा जास्त लसींच्या मात्रा  (23,11,68,480) विनामूल्य राज्य निहाय वितरण आणि राज्याकडून  थेट खरेदी या दोन्ही  प्रकारात उपलब्ध करून दिल्या आहेत.

 यापैकी  वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 21,22,38,652 लसींच्या मात्रा (आज सकाळी 8 वाजता उपलब्ध आकडेवारीनुसार) वापरल्या गेल्या आहेत.

 1.75 कोटींपेक्षा जास्त कोविड लसींच्या मात्रा   (1,75,48,648) अद्याप राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत.

 याशिवाय सरकार  2.73 लाख (2,73,970) हून अधिक लसींच्या मात्रा उपलब्ध करण्याच्या  प्रक्रियेत असून पुढील 3 दिवसांत त्या  राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होतील.

 ***

Jaidevi PS/SP/DY

एचएफडब्ल्यू / कोविड लस राज्यनिहाय पुरवठा  / 31st मे 2021/3

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1723057) Visitor Counter : 210