आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड मदतीसंदर्भात अद्ययावत माहिती


देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 18,265 ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटर्स,19,085 ऑक्सिजन सिलिंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 15,256 व्हेन्टिलेटर्स/बायपॅप, रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या सुमारे 7.7 लाख कुप्या, फावीपिरावीर औषधाच्या सुमारे 12 लाख गोळ्या वितरीत/रवाना

Posted On: 30 MAY 2021 7:05PM by PIB Mumbai

 

भारत सरकारला 27 एप्रिल 2021 पासून कोविड -19  वैद्यकीय मदत सामग्री पुरवठा आणि उपकरणे यांचे विविध देशांकडून/संस्थांकडून आंतरराष्ट्रीय सहकार्य प्राप्त होत आहे. ही मदत सामग्री राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्वरेने वितरीत/रवाना करण्यात येत आहे.

27 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 पर्यंत रस्ते आणि हवाई मार्गांद्वारे एकूण, 18,265 ऑक्सिजन काँन्स्नट्रेटर्स, 19,085 ऑक्सिजन सिलिंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे 15,256 व्हेंटीलेटर्स/बायपॅप; रेमडेसिवीर इंजेक्शनच्या सुमारे 7.7 लाख कुप्या, फावीपिरावीर औषधाच्या 12 लाख गोळ्या वितरीत/रवाना करण्यात आल्या आहेत.

 

Consignments

Quantity

Oxygen Concentrators

225

Baricitinib

5.6 lakh tablets

 

27/29 मे 2021 दरम्यान दक्षिण कोरिया, इंडियन बहरीन असोसिएशन, शांघाय भारतीय समुदाय, युएईतील उद्योग आणि व्यावसायिक समूह, सीट्रीप (Ctrip) आणि एली लिली (Eli Lily) यांच्याकडून प्रामुख्याने पुढील वस्तू प्राप्त झाल्या आहेत. शिवाय रँपिड डायग्नोस्टिक कीट्स सुध्दा प्राप्त झाले आहेत.

राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि संस्थांना यांना या  सामग्रीचे प्रभावी, त्वरित वाटप आणि सुव्यवस्थितपणे ते वितरीत करण्याचे कार्य अविरतपणे  सुरू आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय नियमितपणे यावर एकात्मिकपणे (व्यापकतेने)देखरेख ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणून अनुदान, मदत आणि देणगी स्वरूपात परदेशी कोविड मदत सामग्री प्राप्त झाल्यानंतर वाटपाच्या दृष्टीने समन्वय साधण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात एक समर्पित समन्वय कक्ष तयार करण्यात आला आहे. हा कक्ष दिनांक  26 एप्रिल, 2021 पासून कार्यरत आहे. आरोग्य मंत्रालयाने 2 मे 2021 पासून प्रमाणित कार्यान्वयन प्रक्रिया तयार केली असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

***

S.Thakur/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1722965) Visitor Counter : 174