माहिती आणि प्रसारण मंत्रालय

राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकाच्या प्रचारासाठी नियमावली

Posted On: 30 MAY 2021 7:00PM by PIB Mumbai

 

प्राईम टाईम मध्ये ठराविक अंतराने बातम्या किंवा इतर सुयोग्य मार्गाद्वारे खालील राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकाविषयी जनजागृती करण्यासाठी  माहिती व प्रसारण मंत्रालयाने आज सर्व खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना सूचनावली जाहीर केली आहे.

 

1075

National Helpline no. of Ministry of Health and Family Welfare

1098

Child Helpline No. of the Ministry of Women and Child Development

14567

Senior   Citizens    Helpline   of   the   Ministry   of    Social Justice and Empowerment

(NCT Delhi, Karnataka, Madhya Pradesh, Rajasthan, Tamil Nadu,

Telangana, Uttar Pradesh and Uttarakhand)

08046110007

Helpline No. of NIMHANS for psychological support

हे राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक नागरिकांच्या हितासाठी शासनाने तयार केले असून त्याचा प्रचार केला जात आहे.

कोविड उपचार नियमावली, कोविड अनुरूप वर्तन आणि लसीकरण अशा तीन महत्वाच्या मुद्द्यांबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारने गेल्या कित्येक महिन्यांपासून विविध साधने व मुद्रित माध्यम, दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि समाज माध्यमांसारख्या माध्यमांद्वारे जनजागृती केली असल्याचे या सूचनावलीतून अधोरेखित होत आहे.

या महामारीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना पूरक ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल आणि लोकांमध्ये उपरोक्त तीन गोष्टींविषयी जागरूकता निर्माण केल्याबद्दल ही सूचनावली खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना श्रेय देते. खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी हे कार्य पुढे नेण्यासाठी आवाहन करण्यात आले असून राष्ट्रीय पातळीवरील चार हेल्पलाईन क्रमांकांबाबत जागरूकता वाढविण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे.

***

S.Thakur/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1722963) Visitor Counter : 304