रेल्वे मंत्रालय
कोविडविरुद्धच्या लढ्यातील बहुमोल योगदानाबद्दल भारतीय रेल्वेचे इतिहासात स्मरण केले जाईल,राष्ट्रीय पुरवठा साखळीतील सातत्य कायम राखत असतानाच प्रगतीचा वेग केला सुनिश्चित - पियुष गोयल
भांडवली खर्चाचा पूर्णपणे वापर करण्यासाठी आग्रही रहा, पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केल्याने कोविडमधील आव्हानात्मक काळात रोजगार निर्मितीही होईल – गोयल
Posted On:
26 MAY 2021 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 मे 2021
कोविडविरुद्धच्या लढ्यातील बहुमोल योगदानाबद्दल भारतीय रेल्वेचे इतिहासात स्मरण केले जाईल. राष्ट्रीय पुरवठा साखळीतील सातत्य कायम राखत असताना प्रगतीचा वेग सुनिश्चित केल्याचे, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. प्रदेश आणि विभागांच्या कार्यात्मक कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.
गोयल म्हणाले की, गेल्या 14 महिन्यांच्या काळात रेल्वेने उच्च नैतिक सामर्थ्य आणि क्षमतेचे दर्शन घडवले आहे.
भांडवली खर्चाचा पूर्णपणे वापर करून घेण्यासाठी आग्रही रहा, अशा सूचना गोयल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केल्यामुळे विशेषतः आव्हानात्मक असलेल्या कोविडमधील काळात रोजगार देखील निर्मिती होत आहे.
मंत्री म्हणाले की, राष्ट्राच्या सेवेत कार्यरत असताना प्राण गमावलेल्यां रेल्वे कर्मचाऱ्यांप्रति संपूर्ण राष्ट्र कृतज्ञ असून शोकभावना व्यक्त करत आहे.
गोयल म्हणाले की, ऑक्सिजन एक्स्प्रेसने अनन्यसाधारण पद्धतीने राष्ट्राची सेवा केली आहे आणि कोविड विरुद्धच्या लढाईमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते म्हणाले की, प्रतिसादाची तत्परता वेग आणि सेवेची गुणवत्ता याची सर्वांनीच प्रशंसा केली आहे. कामातील अनन्य साधारण लवचिकता दाखविल्याबद्दल आणि मालवाहतुकीत भारतीय रेल्वेने दोन अंकी वृद्धी केल्याबद्दल मंत्र्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची प्रशंसा केली.
2019 - 20 या काळाच्या तुलनेत रेल्वेच्या मालवाहतुकीमध्ये 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. 2021 -22 च्या आर्थिक वर्षात, भारतीय रेल्वेची एकूण मालवाहतूक 203.88 दशलक्ष टन आहे, 2019 - 20 च्या आर्थिक वर्षाच्या याच काळातील मालवाहतुकीपेक्षा (184.88 दशलक्ष टन) 10 टक्क्यांहून अधिक आहे.
मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उद्दिष्ट पूर्तीच्या दिशेने काम केल्याबद्दल व्यवसाय विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे मंत्र्यांनी कौतुक केले. त्यांनी पुढे निर्देश दिले की, सर्व गोष्टी अधिक कार्यक्षम आणि सुलभ करण्यासाठी चांगल्या शेड, टर्मिनल, सर्वच शेडचे विद्युतीकरण, माल चढ-उतारासाठी असलेले अद्ययावत यांत्रिकीकरण इत्यादी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
* * *
N.Chitale/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721985)