PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 25 MAY 2021 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 25 मे 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

कोविड-19 विरुद्ध भारताच्या लढाईत दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या 40 दिवसानंतर 2 लाखांपेक्षा कमी झाली आहे  (14 एप्रिल 2021 रोजी दैनंदिन रुग्णांची नोंद  1,84,372 होती). गेल्या 24 तासांत 1,96,427 नवीन रुग्ण आढळले.

उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या देखील आता 25,86,782 पर्यंत कमी झाली आहे. 10 मे 2021 रोजी उपचाराधीन रुग्णांची संख्या सर्वोच्च पातळीवर होती ती आता कमी झाली आहे.  गेल्या 24 तासांत 1,33,934 ची घट झाली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या आता देशातील एकूण बाधित रुग्णांच्या 9.60% आहे.

सलग 12 व्या दिवशी देशात बरे झालेल्या दैनंदिन रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा अधिक आहे. गेल्या 24 तासांत 3,26,850 रुग्ण बरे झाले.

भारतातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 2,40,54,861 वर पोहोचली आहे.  रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय  दर 89.26% पर्यंत वाढला आहे.

गेल्या 24 तासात देशात एकूण 20,58,112 चाचण्या घेण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 33,25,94,176 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दैनंदिन पॉसिटिव्हीटी दर कमी झाला आहे आणि आज तो 9.54% आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 19,85,38,999 लसींच्या मात्रा 28,41,151 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत. यामध्ये 97,79,304  आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 67,18,723 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,50,79,964 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (पहिली मात्रा), 83,55,982 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (दुसरी मात्रा ), 18-44 वयोगटातील 1,19,11,759 लाभार्थी (पहिली मात्रा), 45 ते 60 वयोगटातील 6,15,48,484 (पहिली मात्रा) आणि 99,15,278 (दुसरी मात्रा )तर 60 वर्षांवरील 5,69,15,863 व्यक्तींना पहिली मात्रा तर, 1,83,13,642 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

मागील 24 तासात 18-44 वयोगटासाठी लसीच्या 12.82 लाख मात्रा देण्यात आल्या. 1 मे 2021 पासून व्यापक आणि वेगवान राष्ट्रीय कोविड -19 लसीकरण धोरण राबवल्यापासून ही सर्वाधिक संख्या आहे.

इतर अपडेट्स :

महाराष्ट्र अपडेट्स :-

महाराष्ट्र सरकारने कोविड रुग्णांसाठी गृह विलगीकरण करण्याचा पर्याय बंद करण्याचा निर्णय घेतला असून आणि त्याऐवजी कोविड पॉझिटिव्हिटी दर अधिक असलेल्या विभागांतून संस्थात्मक विलगीकरण आवश्यक केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज मुंबईत आपल्या विविध केंद्रांवर नागरीकांसाठी तीन दिवसांची खास वॉक-इन लसीकरण ( पूर्वनोंदणी विना) मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना या कालावधीत कोविशिल्ड लसीची पहिली आणि दुसरी  मात्रा मिळेल. आरोग्य कर्मचारी आणि आघाडीचे कर्मचारी, तसेच 45 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरीकांना यादरम्यान त्यांची दुसरी मात्रा मिळणार आहे. सर्व वयोगटातील लोकांना कोवाक्सिनची दुसरी मात्रा मिळू शकेल. 18-44 वर्षे वयोगटातील नागरीकांचे स्थानिक स्वराज्य संस्था (पालिकांतून) आणि शासनाने चालविलेल्या लसीकरण केंद्रांमधील लसीकरण स्थगित करण्यात आले आहे.

गोवा अपडेट्‌स:-

गोवा सरकार, दिनांक 26 मे पासून राज्यातील सर्व पंचायत आणि नगरपालिकांमधून  'टीका उत्सव' (लसीकरण उत्सव/अभियान) सुरू करणार आहे, ज्याद्वारे कोविड -19 चा  प्रतिकार करण्यासाठी 45 च्या वरील वयोगटातील सर्व नागरीकांचे लसीकरण केले जाईल. टीका उत्सवाच्या काळात फक्त लसीची पहिली मात्रा  दिली जाईल. गोव्यात सोमवारी 2,362 रूग्ण कोविडमुक्त झाले,कोविड -19 रुग्णसंख्येत 1401 ची भर पडली आणि एकूण रूग्णसंख्या 1,47,861वर पोहोचली, तर या दिवशी (काल) 38 रूग्ण मृत्युमुखी पडले. राज्यातील मृतांचा आकडा 2,421वर पोचला  आहे तर आतापर्यंत कोविडमुक्त होऊन घरी परतलेल्या  रुग्णांची संख्या 1,29,162 वर पोहोचली आहे आणि 16,278 रुग्ण सक्रीय असल्याची नोंद झाली आहे.

 

M.Chopade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1721766) Visitor Counter : 249