आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड मदतकार्याविषयी अद्ययावत माहिती

आतापर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना 17,755 ऑक्सिजन काँसेन्ट्रॅटर्स, 16,301 ऑक्सिजन सिलिंडर्स, 19 ऑक्सिजन उत्पादन संयंत्रे, 13,449 व्हेंटिलेटर्स/बाय पॅप, सुमारे 6.9 लाख रेमडेसीविर कुप्या, सुमारे 12 लाख फॅविपीरावीर च्या गोळ्या पाठवल्या/पोचवल्या गेल्या

Posted On: 25 MAY 2021 4:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 मे 2021

 

भारत सरकारकारकडे विविध देश आणि संस्थांकडून 27 एप्रिल 2021 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य  तसेच कोविड-19 वरील उपचारांसाठी वैद्यकीय साधनसामग्री व उपकरणे प्राप्त होत आहेत. या साधनसामग्रीचे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना त्वरीत वितरण होत आहे.

27 एप्रिल 2021पासून 24 मे 2021 पर्यंत 17,755 ऑक्सिजन काँसेन्ट्रॅटर्स, 16,301 ऑक्सिजन सिलिंडर्स, 19 ऑक्सिजन उत्पादन संयंत्रे, 13,449 व्हेंटिलेटर्स/बाय पॅप, सुमारे 6.9 लाख रेमडेसीविर कुप्या, सुमारे 12 लाख फॅविपीरावीरच्या गोळ्या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना रस्ते व हवाई मार्गाने पाठवल्या/पोचवल्या गेल्या आहेत.

23/24 मे 2021 रोजी संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, ओंटारिओ (कॅनडा), युएसआयएसपीएफ, नेस्ले (स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स) यांच्याकडून आलेली मदत पुढीलप्रमाणे:

Consignments

Quantity

Oxygen Concentrators

20

Oxygen Cylinders

540

Ventilators/Bi-PAP/CPAP

536

संबंधित राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना, तसेच संस्थांना सातत्याने या मदतीचे  प्रभावी व त्वरित विभाजन तसेच योजनाबद्ध वितरण केले जाते आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय या संपूर्ण प्रक्रियेची बारकाईने व नियमितपणे देखरेख करत आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणून अनुदान, मदत आणि देणगी स्वरूपात कोविड मदत सामग्री प्राप्त झाल्यानंतर वाटपाच्या दृष्टीने समन्वय साधण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात एक समर्पित समन्वय कक्ष तयार करण्यात आला आहे. हा कक्ष  26 एप्रिल 2021 पासून कार्यरत आहे. आरोग्य मंत्रालयाने 2 मे 2021 पासून प्रमाणित कार्यान्वयन नियमावली (SOP) तयार केली आणि अंमलात आणली आहे.

 

S.Tupe/U.Raikar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1721612) Visitor Counter : 46