उपराष्ट्रपती कार्यालय
बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी दिल्या जनतेला शुभेच्छा
Posted On:
25 MAY 2021 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मे 2021
बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी राष्ट्राला अभिवादन केले आहे. उपराष्ट्रपतींचा संदेश खालीलप्रमाणे -
“भगवान बुद्धांचा जन्मदिवस ‘बुद्ध पौर्णिमा’ या पवित्र दिवसानिमित्त आपल्या देशातील जनतेस मी हार्दिक शुभेच्छा देतो.
भगवान बुद्ध हे या पृथ्वीवरील महान अध्यात्मिक गुरूंपैकी एक होते. भगवान बुद्धांनी दिलेला शांती, बंधुता आणि करुणेचा शाश्वत संदेश जगभरातील मानवी समुदायांना नैतिक मूल्ये आणि समाधानाचे जीवन जगण्याच्या प्रयत्नांसाठी प्रेरणा देत आहे.
आपल्या देशात कुटुंब आणि मित्र एकत्र येण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी सण ही एक उत्तम संधी असतात. पण कोविड - 19 साथीची परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी घरीच हा उत्सव साजरा करावा, तसेच कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक आरोग्य आणि स्वच्छता नियमांचे पालन करून सण साजरा करावा, असे आवाहन मी करतो.
आनंदाच्या या क्षणी आपण भगवान बुद्धांनी दाखविलेल्या करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी वचनबद्ध होऊया.”
S.Tupe/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721677)
Visitor Counter : 207