PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
24 MAY 2021 6:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 24 मे 2021
- India crosses a major landmark with more than 1 Cr vaccine doses administered for 18-44 age group under Phase-3 of Vaccination Drive
- More than 21.80 crore vaccine doses provided to States/UTs
- On-site Registration/Facilitated Cohort Registration in addition to Online Appointment for 18-44 years age group now Enabled on CoWIN
- Weekly Positivity Rate Declines to 12.66%
- Daily Recoveries outnumber Daily New Cases for 11th consecutive day
- Highest ever single day load of more than 1142 MT of Oxygen relief delivered by Oxygen Expresses
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
कोविड-19 महामारीविरुद्ध सुरु असलेल्या लढ्यात भारताने आज महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात देशाने 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1 कोटीहून जास्त (1,06,21,235) व्यक्तींना लसीच्या मात्रा दिल्या आहेत. चाचणी, संपर्कशोध, उपचार आणि कोविड-योग्य वर्तणूक यांच्यासह लसीकरण हा महामारीचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी भारत सरकारने आखलेल्या समावेशक धोरणाचा अविभाज्य भाग आहे. देशात कोविड-19 प्रतिबंधक व्यापक आणि वेगवान लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरु झाली.
देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात आतापर्यंत देशातील एकूण 19 कोटी 60 लाखांहून जास्त नागरिकांनी कोविड -19 प्रतिबंधक लस घेतली आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीच्या अंतरिम अहवालानुसार, देशात एकूण 28,16,725 सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून कोविड लसीच्या 19,60,51,962 मात्रा दिल्या गेल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 97,60,444 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 67,06,890 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,49,91,357 पहिल्या फळीतील कर्मचारी (पहिली मात्रा), 83,33,774 पहिल्या फळीतील कर्मचारी (दुसरी मात्रा), 18 ते 44 वर्षे वयोगटातील 1,06,21,235 लाभार्थी (पहिली मात्रा), 45 ते 60 वर्षे या वयोगटातील 6,09,11,756 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 98,18,384 लाभार्थी( दुसरी मात्रा) तसेच 60 वर्षांहून जास्त वयाचे 5,66,45,457 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 1,82,62,665 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.
इतर अपडेटस्
- देशव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसींच्या मोफत मात्रा देत केंद्र सरकार सहकार्य करत आहे. यासोबतच राज्ये/ केन्द्र शासित प्रदेशांना लसींची थेट खरेदी करण्याची सुविधाही केंद्र सरकारने दिली आहे. मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत 21.80 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा (21,80,51,890) राज्ये/ केन्द्र शासित प्रदेशांना उपलब्ध केल्या आहेत. अपव्ययासह एकूण 20,00,08,875 मात्रा देण्यात आल्या आहेत. दिनांक 23 मे 2021 रोजी पर्यंतची ही एकूण सरासरी आकडेवारी आहे. (आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार). राज्ये/ केन्द्र शासित प्रदेशांकडे अजूनही 1.80 कोटींहून अधिक (1,80,43,015) मात्रांचा साठा उपलब्ध आहे.
- 1 मे 2021 पासून 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी व्यापक आणि गतिशील राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी सुरु केली. 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींना फक्त ऑनलाईन पद्धतीने वेळनिश्चितीची सुविधा मंजूर केल्यामुळे लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यास मदत झाली. यासंदर्भात, 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाबाबत राज्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विविध सादरीकरणे दिल्यानंतर आणि प्रतिसादात्मक माहिती पुरविल्यानंतर, केंद्र सरकारने आता कोविन डिजिटल मंचावर 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी तसेच सहयोगी सुविधांच्या माध्यमातून नोंदणी करण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
- म्यूकरमायकॉसिस हा कोविड-19 संसर्गावर उपचार घेऊन रोगमुक्त झालेल्या किंवा सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये आढळणारा सर्वसामान्य बुरशीजन्य आजार आहे. या आजाराने बाधित व्यक्तींची संख्या वाढताना दिसत असली तरी हा संसर्गजन्य, म्हणजे कोविड-19 सारखा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरणारा आजार नाही. नवी दिल्ली येथील एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आज पत्र सूचना कार्यालयाच्या नवी दिल्ली येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात माध्यम प्रतिनिधींना संबोधित करताना ही माहिती दिली.
- भारत सरकारकारकडे विविध देश आणि संस्थांकडून 27 एप्रिल 2021 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य तसेच कोविड-19 वरील उपचारांसाठी वैद्यकीय साधनसामग्री व उपकरणे प्राप्त होत आहेत. या साधनसामग्रीचे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना त्वरीत वितरण होत आहे. 22 व 23 मे 2021 रोजी ओन्तारियो (कॅनडा), युके, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, USISPF, बुद्धिस्ट संघ (विएतनाम), एस अँड जे चॅरिटेबल ट्रस्ट ( युके) यांच्याकडून आलेल्या मुख्य सामग्रीत समावेश होता.
- ऑक्सीजन एक्सप्रेसच्या माध्यमातून आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक 1,142 मेट्रीक टनापेक्षा अधिक प्राणवायूची मदत काल पोचवण्यात आली. या आधीची सर्वोत्तम कामगीरी 20 मे 2021 रोजी 1,118 मेट्रीक टन इतकी होती. विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते की ऑक्सीजन एक्सप्रेसचा हा प्रवास 30 दिवसांपूर्वी 24 एप्रिल रोजी सुरु झाला. पहिल्या एक्सप्रेसमधून 126 मेट्रीक टन प्राणवायू महाराष्ट्रात पोहचवण्यात आला. अवघ्या एका महिन्यातच भारतीय रेल्वेने देशभरातील 14 राज्यांमधे 16,000 मेट्रीक टनांहून अधिक द्रवरुप वैदयकीय प्राणवायू पोहचवला आहे.
- सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ट्रान्सजेंडर समुदायाच्या सदस्यांनी सरकारची मदत आणि पाठिंबा मिळविण्याकरिता व्यथा कथन करणारे दूरध्वनी आणि ईमेल केले आहेत. ट्रान्सजेंडर्सच्या कल्याणासाठी नोडल मंत्रालय असलेल्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने प्रत्येक ट्रान्सजेंडरला त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्वरित आधार म्हणून 1500 रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. ही आर्थिक मदत ट्रान्सजेंडर समुदायाला त्यांच्या रोजच्या गरजा भागविण्यास मदत करेल. ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी काम करणार्या स्वयंसेवी संस्था आणि समुदाय आधारित संघटना (सीबीओ) यांना या उपक्रमाविषयी जनजागृती करण्यास सांगितले गेले आहे.
IMPORTANT TWEETS
महाराष्ट्र अपडेट्स :-
तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर बालरोग कोविड खाटांची संख्या सध्याच्या जवळपास 600 वरून सुमारे 2,300 पर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे. गेल्या वर्षी प्रौढांसाठी तयार केलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्र आणि समर्पित कोविड रुग्णालयांच्या धर्तीवर मुलांमधील मध्यम आणि गंभीर कोविड प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी बालरोगविषयक कृतिदलाच्या सल्ल्यानुसार वर्गीकृत आरोग्य सेवा तयार करणे देखील यात अभिप्रेत आहे. महाराष्ट्रात रविवारी 26,672 नव्या कोविड -19 रुग्णांची आणि 594 मृत्यूंची नोंद झाली असून, यामुळे कोविड संसर्ग झालेल्यांची संख्या 55,79,897 झाली असून कोरोना मृत्यूंची संख्या 87,894 झाली आहे. दिवसभरात 29,177 रूग्णांना घरी सोडल्याने महाराष्ट्रात एकूण बरे झालेल्यांची संख्या 51,40,272 इतकी झाली आहे तर 3,48,395 सक्रिय रुग्ण आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण 92.04 टक्क्यांपर्यंत सुधारले असून मृत्यु दर 1.59 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
गोवा अपडेट्स:-
गोवा सरकारने कोविड संचारबंदी 31 मे पर्यंत वाढविली आहे. संचारबंदी कालावधीत रेस्टॉरंट किचन सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत चालू ठेवू शकतात. गोव्यात कोरोना विषाणूचे रुग्ण 1,621 ने वाढल्याने रविवारी रुग्णसंख्या 1,46,460 वर पोहोचली. दिवसभरात 42 रूग्णांचा संसर्गाने मृत्यू झाल्याने कोविड -19 मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2,383 झाली आहे. रविवारी 2,545 रुग्णांना घरी पाठवल्याने गोव्यात बरे होणाऱ्यांची संख्या 1,26,800 वर पोहोचली आहे. गोव्यात सध्या 17,277 सक्रिय रुग्ण आहेत.
***
M.Chopade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721390)
Visitor Counter : 240