आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड मदतीविषयी अद्ययावत माहिती


13,000 हून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स; 15,800 पेक्षा जास्त ऑक्सिजन सिलिंडर्स; 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे; 10,000 पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स/बायपॅप, सुमारे 6.1 लाख रेमडिसीवीरच्या कुप्या आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित/पोहोचवण्यात आल्या आहेत

Posted On: 20 MAY 2021 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2021

 

कोविड विरोधातील भारत सरकारच्या लढ्यात 27 एप्रिल 2021 पासून विविध देश व संस्थांकडून वैद्यकीय सामुग्री व उपकरणांच्या स्वरूपात मदत मिळत आहे. ही मदत तातडीने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित/ पोहोचवली जात आहे.

रस्ते आणि हवाई मार्गाने 27 एप्रिल 2021 ते 19 मे 2021 या कालावधीत 13,000 हून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स; 15,800 पेक्षा जास्त ऑक्सिजन सिलिंडर्स; 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे; 10,000 पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स/बायपॅप, सुमारे 6.1 लाख रेमडिसीवीरच्या कुप्या आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित/पोहोचवण्यात आल्या आहेत.

18/19 मे 2021 रोजी प्रामुख्याने ओंटारियो (कॅनडा), कुवैत, ओमान, म्यानमार, यूएसआयएसपीएफ आणि यूके मेडिकल एड इंटरनेशनलकडून मिळालेली मदत

 

Consignments

Quantity

Oxygen Concentrators

219

Ventilators/Bi-PAP/CPAP

500

*याव्यतिरिक्त पीपीई आणि व्हायरल ट्रान्सपोर्ट मेडिकल ट्यूब्स प्राप्त झाल्या आहेत

राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि संस्थांना मदतीचे सुरळीत आणि तात्काळ वाटप होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय यावर सतत देखरेख करत आहे. देणग्या, निधी, मदत स्वरूपात परदेशातून आलेल्या सर्व वस्तूंचे समायोजन व पाठवणी साठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात एक समायोजन केंद्र उभारले आहे. त्या केंद्राचे काम 26 एप्रिल 2021 पासूनच सुरू झाले आहे. 2 मे 2021 पासून आरोग्य मंत्रालयाने यासाठी एक मार्गदर्शक प्रणाली ठरवून दिली आहे.


* * *

S.Tupe/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720370) Visitor Counter : 181