PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
18 MAY 2021 9:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 18 मे 2021
- Daily Recoveries more than 4 Lakh in the country, for the first time
- India’s Cumulative Vaccination Coverage exceeds 18.44 Crore
- PM Interacts with State and District Officials on the COVID-19 situation
- Biggest single day load of more than 1000 MT of Oxygen relief delivered by Oxygen Expresses
- Railways set to have 86 Oxygen plants for its hospitals
- Panchayati Raj Ministry Issues Advisory for the Guidance of Panchayats to combat the COVID-19 Pandemic
|
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
सर्व आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या समर्पित आणि अथक परिश्रमांतून लक्षणीय यश मिळवत भारतात आज पहिल्यांदाच कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या,चार लाखांपेक्षा अधिक नोंदली गेली आहे.
गेल्या 24 तासांत देशात 4,22,436 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या 14 दिवसातली रुग्ण बरे होण्याचीसरासरी संख्या 3,55,944 इतकी नोंदवण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात, 2,63,533 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशभरात नव्याने आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आज सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांपेक्षा कमी आहे. गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत,1,63,232 इतकी घट नोंदवण्यात आली आहे.
भारतात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 2,15,96,512 पर्यंत पोचली. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 85.60% टक्क्यांपर्यंत पोचला आहे.
नव्या रूग्णांपैकी 75.77% रुग्ण दहा राज्यातले आहेत.
तर दुसरीकडे, सक्रीय रुग्णांची संख्या 33,53,765 पर्यंत कमी झाली आहे. यानुसार, देशातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी सक्रीय रुग्णांचे प्रमाण 13.29% इतके आहे.
आठ राज्यांमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या 69.01% इतकी आहे.
भारतात तिसऱ्या टप्प्यात, आतापर्यंत 18.44 कोटींपेक्षा जास्त लोकांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत, आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, एकूण 26,87,638 सत्रांमधून 18,44,53,149 लसींच्या मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. यात, 96,59,441 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा आणि 66,52,389 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोना योध्यांपैकी 1,45,00,303 जणांना पहिली मात्रा, तर 82,17,075 जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 59,39,290 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 45 ते 60 वर्षे वयोगटातील 92,43,104 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 5,46,64,577 लाभार्थ्यांना पहिली मात्रा आणि 1,79,12,354 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.
इतर अपडेटस्
- ॲम्फोटेरिसिन-बी या म्युकरमायकोसिस वरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाची मागणी आणि पुरवठा याचा केंद्रीय खते व रसायने खात्याचे राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी आज आढावा घेतला. उत्पादकांनी देशांतर्गत उत्पादन वाढीला वेग द्यावा तसेच जगभरातून हे औषध आयात करता यावे यासाठी केंद्र सरकारने धोरण आखले आहे. ॲम्फोटेरिसिन-बी औषधाचा पुरवठा अनेक पटीने वाढल्याचे मंत्रिमहोदयांना आढळून आले परंतु त्याच्या मागणीतही अचानक बरीच वाढ झाली आहे. गरजू रुग्णांना हे औषध उपलब्ध व्हावे यासाठी सरकार सर्व आवश्यक आणि उपयुक्त प्रयत्न करण्यास कटीबद्ध आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
- प्राणवायूच्या पुरवठ्यात येणारे सर्व अडथळे दूर करत व अडचणींवर तोडगे शोधून काढत, देशभर द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करण्याचे काम भारतीय रेल्वेकडून अविरत चालू आहे. आतापर्यंत रेल्वेने 675 पेक्षा अधिक टँकर्समधून 11030 मेट्रिक टनापेक्षा अधिक प्राणवायू विविध राज्यांपर्यंत पोहोचवला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्या देशाला दररोज सुमारे 800 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करत आहेत. 23 दिवसांपूर्वी, 24 एप्रिल रोजी महाराष्ट्राला 126 मेट्रिक टन वैद्यकीय द्रवरूप प्राणवायू पोहोचवून या कार्याचा प्रारंभ झाला होता. 24 दिवसांपेक्षा किंचित अधिक काळात रेल्वेने ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांचे प्रचालन वाढवून तेरा राज्यांना 11,030 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू पोहोचविला आहे.
- देशाच्या विविध भागात कोविड 19 साथीच्या रोगाचा प्रसार अलीकडे गंभीर प्रमाणात झाला आहे. ग्रामीण भागातील अडचणींकडे विशेषत: लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामीण समुदायामध्ये तुलनेने कमी प्रमाणात जागरूकता आणि त्याचसोबत खेड्यांमधील अपुऱ्या साहाय्य यंत्रणा, साथीच्या रोगाचा प्रभावी सामना करण्यात अडथळा ठरू शकतात. त्यामुळे पंचायती/ ग्रामीण स्थानिक संस्था यांनी गेल्या वर्षी जसा या आव्हानाचा सामना केला होता त्याप्रमाणे आताही तो करण्यासाठी आणि गावाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य प्रकारे अवगत करण्याची आणि सुविधा पुरवण्याची आवश्यकता आहे. गेल्या वर्षी त्यांनी योजलेल्या विविध उपायांसाठी त्यांचे उच्च स्तरावर कौतुक झाले होते.
- कोविड-19 विरोधातल्या लढ्यात भारतीय रेल्वे कोणतीही कसर ठेवत नाही आहे. एकीकडे रेल्वे, ऑक्सीजन एक्सप्रेसच्या माध्यमातून देशभरातील विविध भागात प्राणवायू सुविहितपणे पोहचवत आहे. दुसरीकडे प्रवासी आणि मालवाहतुकीचे कर्तव्यही चोखपणे बजावत आहे. त्याचवेळी रेल्वेने आपल्या विभागा अंतर्गतच्या वैद्यकीय सुविधाही वाढवण्यावर भर दिला आहे. देशभरातील रेल्वेच्या 86 रुग्णालयांची क्षमता प्रचंड प्रमाणावर वाढवली जात आहे. या अंतर्गत, 4 प्राणवायू प्रकल्प कार्यरत आहेत, 52 प्रकल्पांना मंजूरी दिली असून 30 प्रकल्प प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर आहेत. रेल्वेची सर्व कोविड रुग्णालये प्राणवायू प्रकल्पांनी सुसज्ज होणार आहेत.
- कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या स्थितीत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असलेल्या गरिबांच्या अडचणी दूर करण्यासाठी भारत सरकारने उपाय जाहीर केले आहेत. त्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय) आहे. 17 मे 2021 पर्यंत सर्व 36 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) डेपोमधून 31.80 एलएमटी धान्याची उचल केली आहे. लक्षद्वीपने मे आणि जून 2021 साठीची संपूर्ण उचल घेतली आहे. आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, गोवा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, केरळ, लडाख, मेघालय, मिझोरम, नागालँड, पुद्दुचेरी, तमिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरा, या 15राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी मे 2021 च्या वाटपाची 100% उचल केली आहे. सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पीएमजीकेएवायअंतर्गत मोफत धान्य उचलण्यासाठी आणि त्याचे निर्धारित वेळेत वाटप करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र अपडेट्स
महाराष्ट्रात सोमवारी कोरोना विषाणूच्या नवीन संसर्गाच्या रुग्णसंसंख्येत आणखी घट झाली असून, 24 तासांत 26,616 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 54,05,068 जणांना कोविड संसर्ग झालेला असून, गेल्या 24 तासांतील 516 बळींमुळे कोरोनामृत्यूंची एकूण संख्या 82,486 इतकी झाली आहे.
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
दरम्यान, कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंसंख्येत आता घट होत आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात नवीन रुग्णांची संख्या 81 टक्क्यांनी घटली असून या बाबतीत नांदेड जिल्हा अव्वल ठरला आहे. तर मुंबईत 77 टक्के, ठाण्यात 71 टक्के, पुण्यात 23.47 टक्के, नाशिकमध्ये 30.47 टक्के आणि नागपूरमध्ये 58.54 टक्के घट दिसून आली आहे. याखेरीज, भंडारा, नंदूरबार, लातूर, रायगड, जालना, हिंगोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्येही सकारात्मक परिस्थिती आहे. असे आशादायक चित्र असले तरीही, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, सातारा अशा 18 जिल्ह्यांतील परिस्थितीत मात्र अद्यापि सुधारणा नाही.
***
M.Chopade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1719766)
Visitor Counter : 200