रसायन आणि खते मंत्रालय

केंद्रीय खते आणि रसायने मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ॲम्फोटेरिसिन-बी या म्युकरमायकोसिसवरील औषधाची मागणी आणि पुरवठा यांचा घेतला आढावा


औषधाचा योग्य वापर करण्याची केली सूचना

Posted On: 18 MAY 2021 4:04PM by PIB Mumbai

 

ॲम्फोटेरिसिन-बी या म्युकरमायकोसिस वरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाची मागणी आणि पुरवठा याचा केंद्रीय खते व रसायने खात्याचे राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी आज आढावा घेतला. उत्पादकांनी देशांतर्गत उत्पादन वाढीला वेग द्यावा तसेच जगभरातून हे औषध आयात करता यावे यासाठी केंद्र सरकारने धोरण आखले आहे.

ॲम्फोटेरिसिन-बी औषधाचा पुरवठा अनेक पटीने वाढल्याचे मंत्रिमहोदयांना आढळून आले परंतु त्याच्या मागणीतही अचानक बरीच वाढ झाली आहे. गरजू रुग्णांना हे औषध उपलब्ध व्हावे यासाठी सरकार सर्व आवश्यक आणि उपयुक्त प्रयत्न करण्यास कटीबद्ध आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ॲम्फोटेरिसिन-बी औषधाचे परिणामकारक वितरण तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापन यासाठी सरकार व्यवस्था निर्धारीत करत आहे.  औषधांचा तुटवडा लवकरच संपुष्टात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मार्गदर्शक सूचनांप्रमाणे या औषधाचा वापर राज्यांनी योग्य पध्दतीने करावा असेही मांडवीय यांनी यावेळी राज्यांना सांगितले.

Reviewed requirement and supply position of #AmphotericinB which cures Mucormycosis. We have chalked out a strategy with manufacturers to ramp up domestic production as well as to import the drug from all over the world. (1/3)

— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) May 18, 2021

***

S.Tupe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1719603) Visitor Counter : 192