संरक्षण मंत्रालय

तौते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दलाची तयारी जारी

Posted On: 17 MAY 2021 8:30AM by PIB Mumbai

तौते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दलाची तयारी जारी

तौते चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी भारतीय हवाई दलाची तयारी जारी असून रविवारी 16 मे  21ला भारतीय हवाई दलाने, एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे 16.5 टन  सामान आणि 167 कर्मचारी कोलकाताहून अहमदाबाद इथे नेण्यासाठी 2 C-130J आणि 1 An-32 विमाने  तैनात केली . An-32 सध्या अहमदाबादच्या मार्गावर आहे.

याच कारणासाठी एनडीआरएफचे 121 जवान आणि 11.6 टन साहित्य घेऊन C-130J आणि 2 An-32 विमाने विजयवाडाहून अहमदाबादला गेली आहेत.

2 C-130J विमानेही एनडीआरएफचे 110  जवान आणि 15 टन सामान घेऊन पुण्याहून अहमदाबादला गेली आहेत.

***

ST/NC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1719285) Visitor Counter : 191