आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड लसींच्या वितरणाबद्दल ताजी माहिती
16 ते 31 मे दरम्यान केंद्र सरकार सुमारे 192 लाख कोविड लसीचा मोफत पुरवठा राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना करणार
Posted On:
14 MAY 2021 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2021
आतापर्यंत देशभरात सुमारे 18 कोटी लसींचे डोस नागरिकांना दिले गेले आहेत( आज सकाळी 7 वाजता दिलेल्या अहवालानुसार 17.93 कोटी मात्रा). कोविड लसीकरण मोहिमेचे आज 118 दिवस यशस्वीपणे पूर्ण झाले असून, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त प्रयत्नांतून 17.89 कोटी लसमात्रा देशभरातील लाभार्थ्यांना दिल्या गेल्या आहेत. 17 कोटी लसमात्रांचा टप्पा 114 दिवसांत यशस्वीपणे पार करणारा भारत हा जगातील सगळ्यात गतिमान देश आहे. हा टप्पा गाठण्यासाठी अमेरिकेने 115 दिवस ,तर चीन ने 119 दिवस घेतले होते.
'मुक्त किंमत व्यवस्था व गतिशील राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण धोरण' 1 मे 2021 पासून लागू केले गेले असून, त्यानुसार उपलब्ध लसमात्रांपैकी 50 टक्के मात्रा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना , भारत सरकारच्या मोफत पुरवठा मार्गिकेद्वारे , पुरवठा करण्यासाठी राखून ठेवल्या जातील, आणि उर्वरित 50 टक्के मात्रा लस उत्पादन कंपन्यांकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी किंवा खाजगी रुग्णालयांनी थेट खरेदी करण्यासाठी उपलब्ध असतील.
येत्या पंधरवड्यात राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडे दुसऱ्या मात्रेसाठी पात्र असलेल्या लाभार्थीची संख्या व त्यासाठी लागणारा वेळ ,या दोन मुद्द्यावर भारत सरकार चा पुरवठा अवलंबून असेल. 16 ते 31 मे या पंधरवड्यादरम्यान कोविशील्ड व कोवॅक्सिनच्या 191.99 लाख मात्रा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवल्या जातील. यामध्ये 162.5 लाख कोविशील्ड आणि 29.49 लाख कोवॅक्सिनच्या मात्रा असतील.
या मात्रांच्या वितरणाचे वेळापत्रक आगाऊ कळवले जाईल. पाठवलेल्या लसींचा योग्य प्रकारे उपयोग करावा, व लस वाया जाण्याचे प्रमाण कमीतकमी असावे यासाठी राज्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी विनंती केली गेली आहे.
45 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी तसेच HCW व FLW साठी असलेल्या या मोफत लसमात्राचा वापर जास्तीत जास्त व सुयोग्य पद्धतीने करण्यासाठी राज्य सरकारांना योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी वेळ मिळावा , यासाठी त्याची आगाऊ सूचना भारत सरकारतर्फे राज्य सरकारांना दिली जात आहे. याच्या आधी 1 ते 15 मे दरम्यान 1. 7 कोटींहून अधिक लसमात्रा केंद्र सरकारने राज्य सरकारांना मोफत उपलब्ध करुन दिल्या होत्या.
याशिवाय मे 2021मध्ये 4.39 कोटी लसमात्रा राज्य सरकारे, तसेच खाजगी रुग्णालयांच्या थेट खरेदीसाठी देखील उपलब्ध होत्या.
* * *
S.Thakur/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1718604)
Visitor Counter : 275
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam