गृह मंत्रालय
हवाई प्रवासी रोपवे प्रणाली विकसित करण्यासाठी भारत-तिबेट सीमा पोलिस दलाची जमीन उत्तराखंड सरकारकडे हस्तांतरित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
12 MAY 2021 5:09PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मसूरी येथील भारत -तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) मालकीची 1500 चौरस मीटर जमीन उत्तराखंड राज्य सरकारला देहरादून आणि मसुरी दरम्यान 'हवाई प्रवासी रोपवे प्रणाली ; या पायाभूत प्रकल्पासाठी हस्तांतरित करायला मान्यता देण्यात आली आहे.
प्रस्तावित रोपवे 5580 मीटर लांबीचा मोनो-केबल रोपवे असून सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्पांतर्गत बांधण्यात येईल. पुरकुल गाव, देहरादून (लोअर टर्मिनल स्टेशन) आणि लायब्ररी, मसूरी (अप्पर टर्मिनल स्टेशन) असेल आणि आणि यासाठी अंदाजे .285 कोटी रुपये खर्च होणार असून दर तासाला 1000 लोकांची वहन क्षमता असेल. यामुळे देहरादून ते मसूरी दरम्यान रस्ते मार्गावरील वाहतुकीचा ओघ कमी होईल.
याव्यतिरिक्त, यामुळे 350 रोजगारांची थेट निर्मिती होईल आणि 1500 हून अधिक लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकेल. हे काम पूर्ण झाल्यावर रोप वे पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण ठरेल आणि यामुळे राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळेल आणि पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या अतिरिक्त संधी निर्माण होतील.
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1717989)
आगंतुक पटल : 178