आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील सक्रीय कोविड रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घसरण


नव्या रोगमुक्त रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी नव्या दैनंदिन बाधितांहून जास्त

भारतात देण्यात आलेल्या एकूण लसीकरण मात्रांची संख्या 17.5 कोटींहून जास्त

आतापर्यंत 18 ते 44 वर्षे वयोगटातील 30 लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे झाले लसीकरण

Posted On: 12 MAY 2021 3:50PM by PIB Mumbai

 

भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत असून आता ती 37,04,099 झाली आहे. देशातील एकूण सक्रीय रुग्णसंख्येच्या ती 15.87% इतकी आहे.

गेल्या 24 तासांत कोविड सक्रीय रुग्णसंख्येत 11,122 नी घसरण झाली आहे. सक्रीय रुग्णसंख्येत घसरण होण्याचा आजचा सलग दुसरा दिवस आहे.

देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी 82.51% रुग्ण हे देशातील 13 राज्यांमधील आहेत

राज्यांतील सक्रीय रुग्णांच्या संख्येतील गेल्या 24 तासांतील बदल खालील आलेखात दर्शविला आहे.

गेल्या काही आठवड्यांतील कोविड सक्रीय रुग्णांच्या संख्येतील दर दिवसानुसार होणारे बदल खालील आलेखात अधोरेखित केले आहेत.

भारतात आतापर्यंत कोविड मुक्त झालेल्यांची संख्या आजमितीला 1,93,82,642 इतकी आहे तर राष्ट्रीय रोगमुक्ती दर 83.04% आहे.

गेल्या 24 तासांत 3,55,338  रुग्ण कोविडमधून मुक्त झाले.

सलग दुसऱ्या दिवशी रोगमुक्त झालेल्यांची संख्या दैनंदिन पातळीवर नव्याने बाधित झालेल्यांपेक्षा जास्त होती.

71.58% रुग्ण हे देशाच्या दहा राज्यांमधील आहेत.

संपूर्णतः सरकार दृष्टीकोनाच्या माध्यमातून राज्य सरकारांच्या कोविड व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना पाठबळ पुरविण्यासाठी भारत सरकार जागतिक पातळीवरून आलेल्या  मदतीचे अत्यंत तातडीने वितरण करीत आहे. भारताला केलेल्या जागतिक मदतीच्या रूपाने, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कोविड प्रतिसादाला बळकट करून मदत करण्यासाठी  आतापर्यंत एकूण 9,200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 5,243  ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 5,913  व्हेन्टिलेटर्स/बाय पॅप, रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 3.44 लाख कुप्या  प्राप्त झाल्या आहेत.  केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जागतिक मदतीचे सुरळीत आणि जलद वितरण सुनिश्चित करण्यासाठी वेगवान सीमा शुल्क विभाग मंजुरी आणि हवाई तसेच रस्ते मार्गांचा वापर करीत आहे.

दुसरीकडे, राष्ट्रव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याचा विस्तार होत असताना देशातील लसीकरण झालेल्यांच्या  एकूण संख्येने  17.52 कोटींचा आकडा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीच्या अंतरिम  अहवालानुसार, देशात आज  एकूण 25,47,534 सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून कोविड लसीच्या 17,52,35,991मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेतलेले 95,82,449 आरोग्य सेवा कर्मचारी तर लसीची दुसरी मात्रा घेतलेले 65,39,376 आरोग्य सेवा कर्मचारी, 1,41,49,634 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 79,52,537 आघाडीवरील कर्मचारी (दुसरी मात्रा), 18 ते 45 वर्षे वयोगटातील 30,44,463 लाभार्थी (पहिली मात्रा) तसेच 45 ते 60 वर्षे या वयोगटातील 5,58,83,416 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 78,36,168 लाभार्थी (दुसरी मात्रा) तसेच 60 वर्षांहून जास्त वयाचे 5,39,59,7721 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 1,62,88,176 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

HCWs

1st Dose

95,82,449

2nd Dose

65,39,376

FLWs

1st Dose

1,41,49,634

2nd Dose

79,52,537

Age Group 18-44 years

1st Dose

30,44,463

Age Group 45 to 60 years

1st Dose

5,58,83,416

2nd Dose

78,36,168

Over 60 years

1st Dose

5,39,59,772

2nd Dose

1,62,88,176

 

Total

17,52,35,991

 

देशात आतापर्यंत दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांपैकी 66.67% मात्रा दहा राज्यांमध्ये दिल्या गेल्या आहेत.

गेल्या 24 तासांत 18-44 वर्षे वयोगटाच्या 4,79,282 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. आणि लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्यामध्ये  30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  एकूण 30,44,463 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

खालील तक्त्यामध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना दिल्या गेलेल्या एकूण मात्रा दिल्या आहेत.

S. No.

States

Total

1

A & N Islands

1,099

2

Andhra Pradesh

812

3

Assam

1,22,442

4

Bihar

2,39,453

5

Chandigarh

2

6

Chhattisgarh

1,026

7

Delhi

4,21,487

8

Goa

1,344

9

Gujarat

3,56,297

10

Haryana

3,30,236

11

Himachal Pradesh

14

12

Jammu & Kashmir

29,659

13

Jharkhand

94

14

Karnataka

47,627

15

Kerala

586

16

Ladakh

86

17

Madhya Pradesh

48,985

18

Maharashtra

5,96,090

19

Meghalaya

4

20

Nagaland

4

21

Odisha

69,018

22

Puducherry

1

23

Punjab

4,835

24

Rajasthan

4,91,826

25

Tamil Nadu

19,810

26

Telangana

500

27

Tripura

2

28

Uttar Pradesh

2,17,292

29

Uttarakhand

34,157

30

West Bengal

9,675

Total

30,44,463

 

गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या 24.4  लाखांहून जास्त मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण मोहिमेच्या 116 व्या दिवशी, (11 मे 2021 रोजी) कोविड प्रतिबंधक लसीच्या  24,46,674 मात्रा देण्यात आल्या. एकूण 18,543 लसीकरण सत्रांच्या आयोजनाच्या माध्यमातून  10,92,452 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा तर 13,54,222 लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

HCWs

1stDose

17,147

2ndDose

32,699

FLWs

1stDose

90,338

2nd Dose

96,445

18-44 years

1st Dose

4,79,282

45 to 60 years

1stDose

3,58,076

2nd Dose

6,19,017

Over 60 years

1stDose

1,47,609

2nd Dose

6,06,061

Total Achievement

1stDose

10,92,452

2ndDose

13,54,222

 

गेल्या 24 तासांत, देशात 3,48,421 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

देशातील गेल्या 24 तासांत नव्याने नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी 71.22% रुग्ण हे  दहा राज्यांमधील आहेत.

महाराष्ट्रात दैनंदिन पातळीवर सर्वात जास्त म्हणजे 40,956नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. त्यापाठोपाठ, कर्नाटकात  एका दिवसात 39,510 आणि केरळमध्ये 37,290 नवे रुग्ण सापडले.

खालील आलेख देशातील नव्या बाधितांची दैनंदिन संख्यावाढ आणि दैनंदिन पातळीवर चाचण्यांचे वाढते प्रमाण अधोरेखित करतो.

राष्ट्रीय मृत्युदर सध्या 1.09% इतका आहे.

गेल्या 24 तासांत, कोविडमुळे  देशात 4,205 रुग्णांचा मृत्यू झाला.

यापैकी 73.17% रुग्ण देशाच्या दहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 793 कोविड ग्रस्तांचा बळी गेला, तर त्यापाठोपाठ कर्नाटकात एका दिवसात 480 रुग्ण मृत्युमुखी पडले.

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1717950) Visitor Counter : 222