अर्थ मंत्रालय

आर्थिक व्यवहार विभाग, भारत सरकार आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्या संयुक्तपणे विद्यमाने “सामाजिक पायाभूत वित्तपुरवठा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर” या विषयावर व्हर्च्युअल चर्चासत्राचे आयोजन

Posted On: 11 MAY 2021 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मे 2021

 

भारत ब्रिक्स अध्यक्षपद , 2021  या  अंतर्गत आर्थिक आणि वित्तीय सहकार्य कार्यक्रमांतर्गत  आर्थिक व्यवहार विभाग, अर्थ मंत्रालय भारत सरकार आणि न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) सामाजिक पायाभूत  वित्तपुरवठा आणि  डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर  या विषयावर 13 मे 2021 रोजी संयुक्तपणे एक व्हर्चुअल चर्चासत्र आयोजित करणार  आहेत.

कोविड 19 महामारीने  सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूकीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित  केले आहे आणि प्रगत व उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या  फायद्याचे महत्त्व देखील पटवून दिले आहे. भेडसावणारी सर्व आव्हाने सर्वांसाठी विशेषत: ब्रिक्स राष्ट्रांसाठी सारखीच आहेत. सामाजिक, आर्थिक आणि डिजिटल विकासाशी संबंधित लाभ सामायिक करणे आणि पुढे जाण्याचा मार्ग आखण्यासाठी शाश्वत  यंत्रणा तयार करण्याची यात मोठी क्षमता आहे.

या चर्चासत्रात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील उच्च स्तरीय प्रतिनिधी सहभागी होतील आणि 21 व्या शतकातील सामाजिक पायाभूत वित्तपुरवठा आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराच्या प्रमुख मुद्यांवर भर दिला जाईल.

पॅनेल चर्चा आणि दोन संकल्पना  सत्रादरम्यान, पुढील  विविध विषयावर चर्चा होणार आहे

  1. शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूकीचे महत्त्व
  2. सामाजिक पायाभूत अर्थसहाय्याशी संबंधित आव्हाने दूर करण्यासाठी पावले उचलणे
  3. खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी प्रकल्पांची जोखीम दूर करणे
  4. कोविड -19 नंतरच्या काळात  आरोग्य आणि शिक्षण सेवा वाढविण्यासाठी सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करण्याचे महत्व

आणि

5. ब्रिक्स देशांमध्ये  पायाभूत सुविधांना वित्तसहाय्य पुरवण्यासाठी  व्यवहार्य मॉडेल्स आणि साधनांचा शोध घेणे यावर चर्चा होणार आहे.

केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव  अजय सेठ यांचे   उद्घाटनपर भाषण होईल.  त्यानंतर अध्यक्ष न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष मार्कोस ट्रॉयजो यांचे भाषण होईल. कोलंबिया विद्यापीठाच्या शाश्वत विकास केंद्राचे संचालक प्रा. जेफ्री डी. सॅक्स यांचे  उद्घाटन सत्रात बीजभाषण होणार आहे.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1717650) Visitor Counter : 187