पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांचे वैज्ञानिकांना अभिवादन
Posted On:
11 MAY 2021 11:49AM by PIB Mumbai
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिक तसेच तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या सर्वांचे कौतुक केले आहे.
त्यानिमित्त केलेल्या ट्वीटर संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले,
“राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आम्ही आमच्या शास्त्रज्ञांच्या आणि तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्यांच्या मेहनतीला आणि कल्पकतेला अभिवादन करतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे सामर्थ्य दाखवून देणाऱ्या 1998 च्या पोखरण चाचणीच्या आठवणींचे आम्ही अभिमानाने स्मरण करतो.
आव्हान देणाऱ्या प्रत्येक प्रसंगी, आमचे वैज्ञानिक आणि नवोन्मेषी नेहमीच ठामपणे उभे राहिले आहेत आणि त्या आव्हानांची तीव्रता सौम्य करण्यासाठी त्यांनी यथोचित कार्य केले आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी कोविड -19 विरोधात लढा देण्यासाठी उद्यमशील वृत्तीने कार्य केले आहे. त्यांच्या या मनोवृत्तीचे आणि उल्लेखनीय उत्साहाचे मला कौतुक वाटते.”
***
Jaydevi PS/MV/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1717617)
Visitor Counter : 321
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam