वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
ट्रिप्स करारातल्या तरतुदींमध्ये शिथिलता देण्याच्या मुद्द्यावर अमेरिकेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल भारताचे निवेदन
Posted On:
06 MAY 2021 8:03PM by PIB Mumbai
सध्या आलेले जागतिक आरोग्य संकट आणि कोविड-19 महामारीशी एकत्रित लढा देण्याची गरज लक्षात घेऊन, भारत आणि दक्षिण आफ्रिकेने 2 ऑक्टोबर 2020 रोजी, ट्रिप्स (TRIPS) म्हणजेच बौद्धिक संपदा अधिकारांविषयीचे व्यापार-संबंधित मुद्दे या करारातील काही तरतुदी शिथिल कराव्यात अशा मागणीचा प्रस्ताव, जागतिक व्यापार संघटनेकडे पाठवला होता. असे झाल्यास, जगभरातल्या विकसनशील देशांना लसी आणि औषधांच्या निर्मितीसाठी जलद आणि किफायतशीर मार्ग मिळू शकेल. भारत आणि इतर समविचारी देशांनी हा WTO मध्ये हा प्रस्ताव सक्रीयपणे लावून धरल्यामुळे, आज या प्रस्तावाला 120 पेक्षा अधिक देशांनी पाठींबा दिला आहे.
नुकतीच, म्हणजे 26 एप्रिलला पंतप्रधांनांची अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा झाली त्यावेळी मोदी यांनी बायडन यांना या प्रस्तावाबाबत भारताने घेतलेल्या पुढाकाराची आणि मानवतेच्या हितासाठी हा प्रस्ताव फायदेशीर असल्याची माहिती दिली होती.
अमेरिकन सरकारने 5 मे 2021 रोजी या प्रस्तावाला आपला पाठींबा जाहीर केला असून त्यांच्या या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. अशा परस्पर सहमतीच्या दृष्टीकोनातून जागतिक व्यापार संघटनेत हा प्रस्ताव लवकरात लवकर संमत होईल, अशी आम्हाला आशा आहे. ट्रिप्स करारातील काही तरतुदी शिथिल करणे हे कोविड-19 ची लस आणि इतर औषधे सर्वांना परवडणाऱ्या दरात आणि जलद उपलब्ध होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
***
M.Chopade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716612)
Visitor Counter : 201