PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 06 MAY 2021 6:42PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 6 मे 2021

 

· Effective Allocation of COVID-19 Materials received from the Global Community by  Centre to States and UTs has led to Resource Augmentation on the Ground

· India’s Cumulative Vaccination Coverage exceeds 16.25 Crore as the Nationwide Vaccination Drive expands

· On a steady streak, over 3.29 Lakh Recoveries in the last 24 hours

· No pendency of Oxygen Concentrators with Indian Customs

  • Indian Navy steps up COVID Relief Operations: Nine Warships transporting Oxygen, Medical Equipment from Abroad

 

 

 

 

 

 

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

  

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड-19 शी संबंधित परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विविध राज्यांमध्ये तसेच जिल्ह्यांमध्ये वाढलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाची सविस्तर माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.ज्या 12 राज्यांमध्ये एक लाख पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण आहेत त्या राज्यांची माहितीही पंतप्रधानांना देण्यात आली. कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा अधिक प्रकोप आहे, याविषयीही त्यांना सांगण्यात आले.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोविड-19 रुग्णसंख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या तसेच  मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा हतबल झाल्या आहेत. वसुधैव कुटुंबकम भावनेला अनुसरून जागतिक कोविड-19 महामारी विरूद्ध या सामूहिक लढाईत भारत सरकारच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी जागतिक समुदायाने मदतीचा हात पुढे केला आहे.

केंद्र सरकारला 27 एप्रिल 2021 पासून विविध देशांकडून कोविड-19 वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणे देणगी/मदत स्वरूपात प्राप्त होत आहेत. आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व वस्तूंचे राज्ये/संस्थांना वाटप करण्यात आले आहे आणि त्यातील बराचसा भाग वितरीत केला आहे. हे काम सुरूच राहणार आहे. या महत्वपूर्ण टप्प्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी विविध माध्यमे आणि उपाययोजनांद्वारे सर्व मदत आणि सहाय्य पुरवणे हे उद्दिष्ट आहे.

तर दुसरीकडे, देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या टप्पा -3 मध्ये आणखी विस्तार होत असल्याने देशभरात देण्यात आलेल्या लसींच्या मात्रांची एकूण संख्या आज 16.25 कोटीच्या पुढे गेली आहे.

12 राज्यांमध्ये 18-44 वर्षे वयोगटातील 9,04,263 लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसींची पहिली मात्रा देण्यात आली. आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार एकूण 29,34,844  सत्रांद्वारे एकूण 16,25,13,339  लसीच्या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.87 टक्के मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 19 लाखाहून अधिक लसींच्या मात्रा  देण्यात आल्या. देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,72,80,844 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 81.99 टक्के आहे. गेल्या  24 तासात  3,29,113 रुग्ण बरे झाले आहेत.बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 74.71% रुग्ण दहा राज्यांमधील आहेत.

गेल्या 24 तासांत 4,12,262 नवीन रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 57,640 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल कर्नाटकात 50,112 तर केरळमध्ये 41,953 नव्या रुग्णांची नोंद झाली. भारतात आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 35,66,398 वर पोहचली आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या16.92 टक्के आहे. देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 81.05 टक्के रुग्ण बारा राज्यांमध्ये आहेत. राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.09 टक्के आहे. गेल्या 24 तासात 3,980 रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी 75.55 टक्के मृत्यू दहा राज्यातले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 920 जणांचा मृत्यू झाला, तर उत्तर प्रदेशात 353 जणांचा मृत्यू झाला.

भारत सरकारने आतापर्यंत लसीच्या 17.15 कोटी पेक्षा जास्त (17,15,42,410) मात्रा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य दिल्या आहेत. यात, वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 16,26,10,905 मात्रा वापरण्यात आल्या आहेत. (आज सकाळी 8 वाजता उपलब्ध माहितीनुसार).

तसेच, आगामी 3 दिवसात लसीच्या 28 लाखांहून अधिक (28,90,360) मात्रा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होणार आहेत.

 

इतर अपडेट्स:

कोविड 19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत जनजागृतीसाठी देखील अनेक प्रयत्न केले जात आहेत . याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या, पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग संस्था, आणि बिट्स पिलानी संस्थेच्या गोवा शाखेच्या  वतीने आज एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. "कोविड पॉझिटीव्ह आहात, मग पुढे काय?" हा वेबिनारचा विषय होता.

नागरी हवाई वाहतूक समुदायाचे वेळेवर लसीकरण सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने  लसीकरण कार्यक्रमाला वेगवान आणि प्रभावी  पद्धतीने सुलभ करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविड  -19 चा उद्रेक झाल्याच्या कालावधीत  गरजू लोकांची ने - आण करण्यासाठी आणि आवश्यक मालवाहतुकीसह   लसी, औषधे, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स इत्यादींची  वैद्यकीय मालवाहतुक बिनदिक्कतपणे करणे सुनिश्चित करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक समुदायाने अथक परिश्रम घेतले आहेत. लसीकरण कार्यक्रमांतर्गत विमानचालन आणि संबंधित सेवांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा प्राधान्य गट म्हणून विचार करण्याची विनंती करणारे पत्र नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांनी यापूर्वीच सर्व राज्य सरकारांना पाठवले आहे.

सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळावी यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स सीमाशुल्क विभागाच्या गोदामात पडून आहेत असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून त्यात तथ्य नाही आणि ते निराधार आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) स्पष्टीकरण दिले आहे की भारतीय सीमाशुल्क विभागाकडे असे काही प्रलंबित नाही.

 

द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन विषयी सविस्तर माहिती :

ऑक्सिजन पुरवण्याच्या विविध प्रकारांपैकी एक म्हणजे द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनचा (एलएमओ) वापर. एलएमओ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा अति जास्त शुद्धतेचा ऑक्सिजन असतो आणि मानवी शरीरामध्ये वापर करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात येते.

 

#IndiaFightsCorona

📢@CSIR_Ind has designed and developed 11 Makeshift #COVID19 hospitals.

➡️Makeshift hospitals have been constructed in 5 States/UTs so far..

✅Integrated with all essentials including #Oxygen supply.#Unite2FightCorona #StaySafe pic.twitter.com/32gVu0pq3O

— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) May 6, 2021

#IndiaFightsCorona

2 cryogenic tankers with 40 MT O2, arranged by France @FranceauQatar and filled by Qatar @MofaQatar_EN to be transported by @indiannavy on INS Trikand to India today.#Unite2FightCorona #StaySafe pic.twitter.com/PmQ64Yo6Tv

— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) May 6, 2021

All about Liquid Medical Oxygen (LMO)- Explained⬇️

Judicious use of oxygen is the need of the hour. Misuse of oxygen cylinders is a serious matter of concern these days. pic.twitter.com/AubvwcwMYS

— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) May 6, 2021

***

 

S.Tupe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1716557) Visitor Counter : 159


Read this release in: English , Assamese , Punjabi