नागरी उड्डाण मंत्रालय

नागरी हवाई वाहतूक समुदायाच्या जलद आणि कार्यक्षम लसीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी


विमानतळ संचालकांद्वारे समर्पित लसीकरण सुविधा स्थापन करण्यात येणार

नोडल अधिकारी नेमण्याचा विमानतळ संचालकांना सल्ला

लसीकरण सुविधांनी कोविड प्रतिबंधक सुरक्षा शिष्टाचारांचे पालन करावे

Posted On: 06 MAY 2021 6:00PM by PIB Mumbai

 

नागरी हवाई वाहतूक समुदायाचे वेळेवर लसीकरण सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने  लसीकरण कार्यक्रमाला वेगवान आणि प्रभावी  पद्धतीने सुलभ करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविड  -19 चा उद्रेक झाल्याच्या कालावधीत  गरजू लोकांची ने - आण करण्यासाठी आणि आवश्यक मालवाहतुकीसह   लसी, औषधे, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स इत्यादींची  वैद्यकीय मालवाहतुक बिनदिक्कतपणे करणे सुनिश्चित करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक समुदायाने अथक परिश्रम घेतले आहेत. लसीकरण कार्यक्रमांतर्गत विमानचालन आणि संबंधित सेवांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा प्राधान्य गट म्हणून विचार करण्याची विनंती करणारे पत्र नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांनी यापूर्वीच सर्व राज्य सरकारांना पाठवले आहे.

मार्गदर्शक सूचनांनुसार, सध्या सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत आपल्या कर्मचार्‍यांचा अंतर्भाव करण्याचा सल्ला नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील सर्व  विभागांना देण्यात आला आहे. मार्गदर्शक सूचनांमध्ये  पुढे नमूद करण्यात आले आहे  की ज्या संघटनांनी यापूर्वी आपल्या कर्मचार्‍यांच्या  लसीकरणाची व्यवस्था शासकीय / खासगी सेवा प्रदात्यांकडे केली आहे, त्यांना ही व्यवस्था सुरु ठेवता येईल.

पुढे, विमानवाहतूक किंवा संबंधित सेवांमधील  (कंत्राटी, हंगामी  वगैरे) कर्मचार्‍यांचे  त्वरित लसीकरण सुलभ करण्यासाठी विमानतळ संचालकांनी त्यांच्याशी  संबंधित विमानतळांवर एक समर्पित लसीकरण सुविधा स्थापन  करण्याचा सल्ला दिला आहे. जे विमानतळांवर कोविड लसीकरण केंद्र स्थापन  करण्यास इच्छुक असतील त्या राज्य सरकारे/ खाजगी सेवा प्रदात्यांशी (रुग्णालये) विमानतळ संचालकांनी तातडीने संपर्क साधावा असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितले आहे.

मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे की, लसीकरण काउंटर उभारणे, स्वतंत्र प्रतीक्षा क्षेत्र (लसीकरण पूर्व तसेच लसीकरणानंतर) यांसारख्या आवश्यक सुविधा विमानतळ संचालकांकडून उभारण्यात याव्यात. कोविड प्रतिबंधक सुरक्षा शिष्टाचारांनुसार, भेट देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी  (मदत कक्ष, पिण्याचे पाणी, हवा खेळती राहण्यासाठी पंखे, स्वछतागृहे इत्यादी ) या मूलभूत सुविधांची  व्यवस्था करणे.  लसीकरणाच्या प्रत्येक मात्रेची  किंमत सेवा प्रदात्यासह विमानतळाच्या संचाकलांद्वारे  ठरविली जाऊ शकते. या सुविधा सर्व हवाई वाहतूक  क्षेत्रातील भागधारकांना समान किंमतीत  उपलब्ध असतील. पुढे असे म्हटले आहे की, विमानतळ क्षेत्रात कार्यरत सर्व एजन्सींनी आपल्या कर्मचार्‍यांना सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी प्रायोजित करण्याची आवश्यकता आहे. कारण संचालक/सेवा प्रदाता प्रत्येक वैयक्तिक प्रकरण हाताळू शकणार नाहीत. याव्यतिरिक्त, त्यांच्याशी संबंधित कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या लसीच्या मात्रेसाठी ऑनलाइन पेमेंट यंत्रणा तयार करण्याचा सल्ला सेवा प्रदात्यांना देण्यात आला आहे.

असे नमूद केले आहे की, लहान विमानतळांवर  (जेथे लसीकरणाची  संख्या कमी असेल आणि खाजगी कंपन्यांना ते व्यवहार्य वाटले नाही)लसीकरण कार्यक्रम व्यापक करण्यासाठी विमानतळ संचालक जिल्हा/स्थानिक प्रशासनाकडे संपर्क साधू शकतात. विमानतळ संचालकाद्वारे स्थापन केलेल्या सुविधा पहिल्या टप्प्यात सर्व नागरी हवाई वाहतूक कर्मचार्‍यांसाठी उपलब्ध असतील आणि त्यानंतर त्याचा विस्तार कुटुंबातील सदस्यांपर्यंत केला जाऊ शकेल.

मार्गदर्शक सूचनांनुसार एटीसी म्हणजेच हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष, विमानाचे चालक दल (कॉकपिट आणि केबिन दोन्ही), मिशन क्रिटीकल आणि प्रवाशांशी संपर्क येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे. प्रयत्नांमध्ये समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकारी (पर्यायी नोडल अधिकारीही सज्ज ठेवता येईल) यांची नेमणूक करण्याचा सल्ला विमानतळ संचालकांना देण्यात आला आहे.

मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, समस्या आणि आव्हाने यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने मंत्रालय आणि  नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाशी  समन्वय साधत   विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष नियमित बैठका घेऊन प्रगतीचा आढावा घेतील. जर लस उपलब्धतेचा प्रश्न असेल तर सुरळीत पुरवठा करण्यासाठी मंत्रालय योग्य स्तरावर कार्य करेल.

आदेशात असे नमूद केले आहे कीओढावलेल्या  कोणत्याही  स्थानिक परिस्थितीचा विचार केल्यास सुचविलेली मार्गदर्शक सूचना संदर्भित आणि सुधारित केल्या जाऊ शकतात मात्र केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्य सरकार संबंधित किंवा एमओसीए यांच्याकडून जारी झालेल्या सर्व सुरक्षा शिष्टाचार आणि कोविड  19 शी संबंधित निर्देशांचे पालन केलेच पाहिजे.

Link to the Guidelines

***

S.Tupe/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716533) Visitor Counter : 225