आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतीय सीमाशुल्क विभागाकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स प्रलंबित नाहीत


आंतरराष्ट्रीय मदत सहाय्य म्हणून देशात 3000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्राप्त झाले असून सर्व वितरित करण्यात/पाठवण्यात आले आहेत

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा जलद पुरवठा करण्यासाठी सीमाशुल्क अधिकारी 24×7 काम करत आहेत

Posted On: 06 MAY 2021 12:16PM by PIB Mumbai

सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळावी यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स सीमाशुल्क विभागाच्या गोदामात पडून आहेत असे वृत्त काही माध्यमांनी दिले होते.

हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून त्यात तथ्य नाही आणि ते निराधार आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) स्पष्टीकरण दिले आहे की भारतीय सीमाशुल्क विभागाकडे असे काही प्रलंबित नाही. भारतीय सीमाशुल्क विभाग आलेल्या सर्व मालाची त्वरित हाताळणी करत आहे आणि कोणत्याही बंदरांवर असा आयात माल पडून नाही.

जागतिक महामारीच्या विरोधात सामूहिक लढ्यात केंद्र  सरकार आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी जागतिक मदत स्वरूपात विविध देशांकडून 3000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स प्राप्त झाली आहेत. यापैकी मॉरिशसने 200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स  पाठवली आहेत, रशियाने (20), ब्रिटनने चार खेप (95 + 120 + 280 + 174), रोमानियामधून  80, आयर्लंडकडून  700, थायलंडकडून 30, चीनकडून 1000 आणि उझबेकिस्तानने  151 कॉन्सन्ट्रेटर्स  पाठवली  आहेत. याव्यतिरिक्त, तैवानने  150  पाठवली आहेत. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स  निर्धारित मोठ्या संस्थांकडे पोचवले जातात किंवा वितरित केले जातात. रस्ते आणि विमान वाहतुकीच्या  माध्यमातूनही मदत सामग्री पाठवण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या गोदामात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा साठा पडून नाही असे स्पष्ट  करण्यात आले आहे.

ऑक्सिजन आणि ऑक्सिजनशी संबंधित उपकरणे इत्यादींसह कोविडशी संबंधित आयात सामुग्रीच्या  उपलब्धतेच्या आवश्यकतेबाबत  भारतीय सीमाशुल्क विभाग संवेदनशील आहे आणि ते जलदगतीने आलेल्या मालाला काही  तासांत त्वरित मंजुरी मिळवून देण्यासाठी  24 x 7 काम करत आहेत. इतर वस्तूंच्या तुलनेत अशा मदत सामुग्रीला सीमाशुल्क विभागाकडून मंजुरीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.  नोडल अधिकार्‍यांना देखरेख व मंजुरीसाठी ईमेलवर संदेश पाठवले जात आहेत, तर आयात कोविड संबंधित सामुग्री प्रलंबित आहे का यावर वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देखरेख ठेवली जात आहे.

अलिकडेच सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडे पडून असलेल्या 3,000 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सच्या साठया संदर्भातील प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयासमोर आले होते आणि सरकारी वकिलांनी असे स्पष्ट केले होते की सध्या अशी कोणतीही सामुग्री सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडे प्रलंबित नाही.

3,000  ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स सीमाशुल्क विभागाकडे  पडून आहेत असे वृत्त  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जात होते, त्याला उत्तर देताना अर्थ मंत्रालयाने  3 मे रोजी एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे  या वृत्ताबाबत  स्पष्टीकरणही दिले. “आम्ही पुन्हा एकदा सीमाशुल्क विभागाकडे याबाबत तपास केला आहे  आणि त्यांच्याकडे अशी कोणतीही खेप प्रलंबित नाही. मात्र  एक  छायाचित्र ट्वीटरवर टाकण्यात आले असल्यामुळे ते नक्की  कुठे पडून आहे याची माहिती आम्हाला कळवा आणि आम्ही त्वरित कारवाई करू. " असे मंत्रालयाने म्हटले आहे .

***

ST/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1716458) Visitor Counter : 243