आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जागतिक समुदायाकडून मिळालेल्या कोविड-19 प्रतिबंधक मदत सामुग्रीचे केंद्राकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रभावी वितरण
यामुळे संसाधने वाढवणे शक्य झाले
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेच्या विस्तारामुळे भारताचे एकूण लसीकरण 16.25 कोटी पेक्षा अधिक
लसीकरण मोहिमेच्या टप्पा -3 अंतर्गत 18 ते 44 वयोगटातील 9 लाखाहून अधिक लाभार्थीचे लसीकरण
गेल्या 24 तासांत 3.29 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले
एप्रिल महिन्यात बरे झालेल्या रुग्णांची साप्ताहिक सरासरी 53 हजारांवरून 3 लाखांपर्यंत वाढली
Posted On:
06 MAY 2021 11:16AM by PIB Mumbai
गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोविड-19 रुग्णसंख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या तसेच मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा हतबल झाल्या आहेत.
वसुधैव कुटुंबकम भावनेला अनुसरून जागतिक कोविड-19 महामारी विरूद्ध या सामूहिक लढाईत भारत सरकारच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी जागतिक समुदायाने मदतीचा हात पुढे केला आहे.
केंद्र सरकारला 27 एप्रिल 2021पासून विविध देशांकडून कोविड-19 वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणे देणगी/मदत स्वरूपात प्राप्त होत आहेत. आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व वस्तूंचे राज्ये/संस्थांना वाटप करण्यात आले आहे आणि त्यातील बराचसा भाग वितरीत केला आहे. हे काम सुरूच राहणार आहे. या महत्वपूर्ण टप्प्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी विविध माध्यमे आणि उपाययोजनांद्वारे सर्व मदत आणि सहाय्य पुरवणे हे उद्दिष्ट आहे.
तर दुसरीकडे, देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या टप्पा -3 मध्ये आणखी विस्तार होत असल्याने देशभरात देण्यात आलेल्या लसींच्या मात्रांची एकूण संख्या आज 16.25 कोटीच्या पुढे गेली आहे.
12 राज्यांमध्ये 18-44 वर्षे वयोगटातील 9,04,263 लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसींची पहिली मात्रा देण्यात आली. ही राज्ये आहेत- छत्तीसगड (1,026), दिल्ली (1,29,096), गुजरात (1,96,860), जम्मू-काश्मीर (16,387), हरियाणा (1,23,484), कर्नाटक (5,328), महाराष्ट्र (1,53,966), ओडिशा(21,031), पंजाब (1,535), राजस्थान (1,80,242), तामिळनाडू (6,415) आणि उत्तर प्रदेश (68,893).
आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार एकूण 29,34,844 सत्रांद्वारे एकूण 16,25,13,339 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 94,80,739 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा),63,54,113 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,36,57,922 आघाडीवरील कर्मचारी (पहिली मात्रा), 74,25,592 आघाडीवरील कर्मचारी(दुसरी मात्रा), 18-44 वयोगटातील 9,04,263 (पहिली मात्रा ), 60 वर्षावरील, 5,31,16,901 लाभार्थी (पहिली मात्रा), 1,29,15,354 (दुसरी मात्रा) आणि 45 ते 60 वयोगटातल्या 5,38,15,026 (पहिली मात्रा), आणि 48,43,429 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.87 टक्के मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 19 लाखाहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
लसीकरण अभियानाच्या -110 व्या दिवशी ( 5 मे 2021) 19,55,733 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
8,99,163 लाभार्थींना 15,903 सत्रात पहिली मात्रा आणि 10,56,570 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,72,80,844 इतकी आहे.
रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 81.99 टक्के आहे.
गेल्या 24 तासात 3,29,113 रुग्ण बरे झाले आहेत.
बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 74.71% रुग्ण दहा राज्यांमधील आहेत.
खालील आलेख दररोज बरे झालेल्या रुग्णांची साप्ताहिक सरासरी दर्शवतो. एप्रिलच्या सुरूवातीला ही सरासरी केवळ 53,816 होती, मात्र एप्रिलच्या अखेरीस सुरू झालेल्या आठवड्यात ही सरासरी 3 लाखांच्या पुढे (3,13,424) गेली आहे.
गेल्या 24 तासांत 4,12,262 नवीन रुग्णांची नोंद झाली.
नव्या रुग्णांपैकी 72.19 टक्के रुग्ण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, हरियाणा, प. बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, राजस्थान या दहा राज्यांमध्ये आहेत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 57,640 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल कर्नाटकात 50,112 तर केरळमध्ये 41,953 नव्या रुग्णांची नोंद झाली
भारतात आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 35,66,398 वर पोहचली आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या16.92 टक्के आहे. .
देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 81.05 टक्के रुग्ण बारा राज्यांमध्ये आहेत.
राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.09 टक्के आहे.
गेल्या 24 तासात 3,980 रुग्णांचा मृत्यू झाला
यापैकी 75.55 टक्के मृत्यू दहा राज्यातले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 920 जणांचा मृत्यू झाला, तर उत्तर प्रदेशात 353 जणांचा मृत्यू झाला.
पाच राज्ये / केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली, नागालँड, अरुणाचल प्रदेश, लडाख आणि मिझोराम यांचा समावेश आहे.
***
Umesh U/Sushama K/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1716454)
Visitor Counter : 253