अर्थ मंत्रालय

महसुली तुट अनुदानापोटी 17  राज्यांना  9,871  कोटी रुपये जारी


गेल्या दोन महिन्यात  एकूण 19,742  कोटी रुपयांचे महसुली तुट अनुदान राज्यांना जारी

Posted On: 06 MAY 2021 5:37PM by PIB Mumbai

 

अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने 2021-22 वर्षासाठी आज महसुली तुटीच्या भरपाईसाठी दुसरा मासिक हप्ता म्हणून पोस्ट डिव्होल्युशन रेव्हन्यू डेफिसिट (पीडीआरडी) अनुदानाअंतर्गत   17 राज्यांना 9,871 कोटी रुपये जारी केले.

दुसरा हप्ता जारी केल्यामुळे  चालू वित्तीय वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात  राज्यांना एकूण 19,742  कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.

आज राज्यनिहाय जारी करण्यात आलेले अनुदान आणि 2021-22 मध्ये राज्यांना जारी करण्यात आलेले पोस्ट डिव्होल्युशन महसुली तुट अनुदानाचे विस्तृत विवरण परिशिष्टात दिले आहे.

राज्य घटनेच्या कलम 275 अंतर्गत राज्यांना पोस्ट डिव्होल्युशन रेव्हन्यू डेफिसिट अनुदान केंद्र सरकार देते.  राज्यांची महसुली तुट भरून काढण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार मासिक हप्त्यात हे अनुदान जारी केले जाते. आयोगाने 17 राज्यांसाठी अशा अनुदानाची शिफारस केली आहे.

पंधराव्या वित्त आयोगाने, आंध्र प्रदेश, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश,कर्नाटक केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांसाठी ही शिफारस केली आहे.

हे अनुदान मिळण्याची राज्यांची पात्रता आणि अनुदानाचे प्रमाण हे राज्याचा  महसूल आणि खर्चाचे यांच्यातील फरकांच्या आधारे आयोग ठरवते. 2021-22 या आर्थिक वर्षातील केलेल्या भरपाईची आयोगानेही दखल घेतली.

पंधराव्या वित्त आयोगाने एकूण पोस्ट डेव्होल्यूशन महसूल तूट अनुदान म्हणून  17 राज्यांना एकूण 1,18,452 कोटी रुपये देण्याची शिफारस केली आहे.

हे अनुदान राज्यांना 12 मासिक हप्त्यांमध्ये दिले जाते.

 

State-wise Post Devolution Revenue Deficit Grant Released

 

S. No.

Name of State

Amount released in May 2021

(2nd  installment)

(Rs. in crore)

Total amount released in 2021-22

(April+May 2021)

(Rs. in crore)

 

Andhra Pradesh

1438.08

2876.16

 

Assam

531.33

1062.66

 

Haryana

11.00

22

 

Himachal Pradesh

854.08

1708.16

 

Karnataka

135.92

271.84

 

Kerala

1657.58

3315.16

 

Manipur

210.33

420.66

 

Meghalaya

106.58

213.16

 

Mizoram

149.17

298.34

 

Nagaland

379.75

759.5

 

Punjab

840.08

1680.16

 

Rajasthan

823.17

1646.34

 

Sikkim

56.50

113

 

Tamil Nadu

183.67

367.34

 

Tripura

378.83

757.66

 

Uttarakhand

647.67

1295.34

 

West Bengal

1467.25

2934.5

 

Total

9,871.00

19,742.00

 

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1716523) Visitor Counter : 166