कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
महामारीच्या पार्श्वभूमीवर, लाभार्थ्यांच्या सोयीसाठी तात्पुरत्या निवृत्तीवेतनाच्या नियमांचे उदारीकरण आणि कालावधी वाढवला - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
05 MAY 2021 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2021
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पूर्वोत्तर प्रदेशाचा विकास (डी ओ एन ईआर),राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन , अणु उर्जा आणि अंतराळ डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, महामारीची परिस्थिती लक्षात घेऊन , सेवानिवृत्ती घेतलेल्या तारखेपासून एका वर्षाच्या कालावधीपर्यंत तात्पुरत्या निवृत्तीवेतनाचे देय अदा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. निवृत्तीवेतन विभाग आणि डी ए आर पी जी म्हणजेच प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत मंत्री म्हणाले की, तात्पुरत्या कौटुंबिक निवृत्तीवेतनाचेही उदारीकरण करण्यात आले आहे. ते म्हणाले की, वेतन आणि लेखा कार्यालयात कौटुंबिक निवृत्तीवेतन प्रकरण पाठविण्याची वाट न पाहता पात्र कुटुंब सदस्याकडून कौटुंबिक निवृत्तीवेतन दाव्याची पावती आणि मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर त्वरित कौटुंबिक निवृत्तीवेतन मंजूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
65A7.jpg)
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, याचप्रमाणे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना अपंगत्व आल्यास आणि अपंगत्व असूनही त्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम ठेवले असल्यास त्यांना एकरकमी भरपाईचा लाभ देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सीसीएस म्हणजेच केंद्रीय नागरी सेवा ( असामान्य निवृत्तीवेतन (ई ओ पी ) नियमांनुसार , जर एखाद्या सरकारी सेवकाला कर्तव्यावर असताना एखाद्या दुखापतीमुळे किंवा आजारामुळे अपंगत्व आले असेल आणि असे अपंगत्व असूनही त्याला सरकारी सेवेत कायम ठेवले गेले असेल तर, त्याला अपंगत्व निवृत्तीवेतनाच्या अपंगत्वाच्या घटकाऐवजी एकरकमी भरपाई दिली जाईल.
मंत्री म्हणाले की, पूर्वीच्या आदेश आणि नियमांच्या आधारे, दि .01.01.2006 पूर्वी दहा वर्षापेक्षा कमी कालावधीची सेवा असलेले आणि अपंग निवृत्तीवेतनासाठी फक्त अपंगत्व घटकच प्राप्त झालेल्या केंद्रीय नागरी शासकीय सेवकांना ग्राह्य धरले जाई, आता अपंगत्व निवृत्तीवेतनासाठी सेवा घटकदेखील पात्र असेल, 01.01.2006 पासून लागू , अपंगत्व व्यतिरिक्त.

याशिवाय, वेळेवर निवृत्तीवेतनाची जमा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने , जेथे पीपीओ (पेन्शन पेमेंट ऑर्डर) जारी करण्यात आली आहे मात्र टाळेबंदीमुळे सीपीएओ किंवा बँकांना पाठवले गेले नाही,तिथे ही प्रकरणे महालेखा नियंत्रकांनी (सीजीए) आवश्यकतेनुसार विचारात घेतली असून सामान्य जनजीवन रुळावर येईपर्यंत कोविड 19 अभूतपूर्व परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवश्यक निर्देश बँकांच्या सीपीएओ आणि सीपीपीसीना जारी करण्यात आले आहेत.
काही प्रकरणांमध्ये , सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतनाची कागदपत्रे सादर न करता सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांचा त्रास टाळण्यासाठी अशा सर्व प्रकरणांमध्ये निवृत्तीवेतनाची थकबाकी (शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपासून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत) अदा करण्यासाठी आणि अशा सर्व प्रकारणांमध्ये शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या तारखेपासून कुटुंबातील सदस्याला कौटुंबिक निवृत्तीवेतन मंजूर करण्यासाठी.निवृत्तीवेतन प्रदान आदेश जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .
डॉ जितेंद्रसिंग यांनी अशीही माहिती दिली की , भविष्य 8.0 हे ऍप्लिकेशन ऑगस्ट 2020 मध्ये सुरु झाले आणि पुशेस (PUSHES ) हे नवीन वैशिष्ट्य डिजी लॉकरमधील ईपीपीओची कायमची नोंद ठेवते. डिजीलॉकर आयडी आधारित अशाप्रकारचे पुश तंत्रज्ञान वापरणारे भविष्य हे पहिले ऍप्लिकेशन आहे.
भारतीय टपाल आणि वेतन बॅँक (आयपीपीबी) त्यांच्या टपाल विभागाअंतर्गत 1,89,000 टपालवाहक आणि ग्रामीण टपालसेवक यांच्यामार्फत घरी जाऊन
डिजिटल हयातीचा दाखला (डीएलसी) संकलित करत आहेत. केंद्र सरकारच्या सुमारे 1,48,325 निवृत्तीवेतनधारकांनी आतापर्यंत या सुविधेचा लाभ घेतला आहे.
डीओपीपीडब्ल्यूने 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका असलेल्या युतीमध्ये प्रवेश केला आहे ज्या देशातील १०० प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांसाठी “डोअरस्टेप बँकिंग” करतात आणि या सेवेद्वारे लाइफ सर्टिफिकेट संग्रहित करण्यासाठी उपलब्ध आहेत.
निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग हा 12 सार्वजनिक बँका ज्या देशातील 100 प्रमुख शहरांमधलया ग्राहकांसाठी “डूअरस्टेप बँकिंग” करतात त्यांच्या या सेवेद्वारे हयातीचा दाखला संकलित करत आहे.
निवृत्तीवेतनधारकांकडून हयातीचा दाखला मिळविण्याकरिता अतिरिक्त सुविधा म्हणून रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांमधील परवानगीनुसार चित्रफितीवर आधारित ग्राहक ओळख प्रक्रिया (व्ही-सीआयपी) स्वीकारण्याचा सल्ला निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने निवृत्तीवेतन वितरीत करणाऱ्या सर्व बँकांना दिला आहे. युको बँक या क्षेत्रात अग्रणी आहे.
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1716329)
आगंतुक पटल : 350