इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय योजनेंतर्गत 19 कंपन्यांनी अर्ज दाखल केले


जागतिक तसेच देशांतर्गत कंपन्यांकडून अर्जाच्या बाबतीत यशस्वी प्रतिसाद - योजनेअंतर्गत अप्लिकेशन विंडोच्या समारोप प्रसंगी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतला मोठी चालना

Posted On: 04 MAY 2021 3:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 मे 2021

आयटी हार्डवेअरसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत (पीएलआय) एकूण 19 कंपन्यांनी अर्ज दाखल केले आहेत. ही योजना 03.03.2021 रोजी अधिसूचित करण्यात आली होती. ही योजना 30.04.2021 पर्यंत अर्ज भरण्यासाठी खुली होती. 01.04.2021 पासून योजने अंतर्गत प्रोत्साहन लागू आहेत.

आयटी हार्डवेअर कंपन्यांतर्गत अर्ज केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर उत्पादक कंपन्यांमध्ये  डेल, आयसीटी (विस्ट्रोन), फ्लेक्सट्रॉनिक्स, राइझिंग स्टार्स हाय-टेक (फॉक्सकॉन) आणि लावा यांचा समावेश आहे.

देशांतर्गत कंपन्या श्रेणी अंतर्गत 14 कंपन्यांनी अर्ज दाखल केले आहेत, ज्यात डिक्सन, इन्फोपॉवर  (सहसरा आणि एमआयटीएसीचा संयुक्त उपक्रम), भगवती (मायक्रोमॅक्स), सिर्मा, ऑर्बिक, नियोलिंक, ऑप्टिमस, नेटवेब, व्हीव्हीडीएन, स्माईल इलेक्ट्रॉनिक्स, पनाचे डिजिलाईफ,  एचएलबीएस, आरडीपी वर्कस्टेशन्स आणि कोकोनिक्स यांचा समावेश आहे.

आयटी हार्डवेअरसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (पीएलआय) 03.03.2021 रोजी अधिसूचित करण्यात आली होती.

या योजनेअंतर्गत ऍप्लिकेशन विंडोचा समारोप करताना  केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, कायदा आणि न्याय मंत्री  रविशंकर प्रसाद म्हणाले की इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर उत्पादने तयार करणाऱ्या जागतिक आणि देशांतर्गत कंपन्याकडून मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहेत.  जागतिक दर्जाचे निर्मिती स्थळ म्हणून भारताच्या उत्कृष्ट प्रगतीवर उद्योगाने पुन्हा आपला विश्वास दाखवला आहे  आणि आत्मनिर्भर भारत या पंतप्रधानांच्या संकल्पनेला  हा मोठा प्रतिसाद आहे.

इलेक्ट्रॉनिक्स 2019 राष्ट्रीय धोरणात जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी उद्योगाला सक्षम बनवून निर्यातीस चालना आणि देशांतर्गत मूल्यवर्धनात वाढीवर लक्ष केंद्रित करून भारताला इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन अँड  मॅन्युफॅक्चरिंग (ईएसडीएम) चे जागतिक केंद्र बनवण्याची कल्पना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आयटी हार्डवेअर उत्पादनांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला  मान्यता दिली. प्रस्तावित योजनेंतर्गत लक्ष्यित आयटी हार्डवेअर विभागांमध्ये लॅपटॉप, टॅब्लेट्स, ऑल-इन-वन पर्सनल कॉम्प्यूटर्स (पीसी) आणि सर्व्हर्सचा समावेश आहे.

पुढील चार वर्षांत या योजनेमुळे अंदाजे 1,60,000 कोटी रुपयांचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. एकूण उत्पादनापैकी आयटी हार्डवेअर कंपन्यांनी 1,35,000 कोटी रुपयांहून अधिक उत्पादन प्रस्तावित केले आहे आणि देशांतर्गत कंपन्यांनी  25,000 कोटींहून अधिक उत्पादन प्रस्तावित केले आहे.

या योजनेमुळे निर्यातीत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. पुढील  4  वर्षांत एकूण 1,60,000 कोटी रुपयांच्या उत्पादनापैकी  37 टक्के म्हणजे 60,000 कोटी रुपये निर्यातीचे योगदान आहे.

या योजनेमुळे पुढील चार वर्षांत अंदाजे 37,500 थेट रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

या योजनेंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीमध्ये देशांतर्गत चॅम्पियन कंपन्यांची निर्मिती जागतिक स्तराचे उद्दिष्टे गाठताना व्होकल फॉर लोकलला चालना देईल.

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1715906) Visitor Counter : 248