आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा टप्पा 3 सुरू झाल्यामुळे भारताचे एकूण लसीकरण 15.89 कोटीहून अधिक


लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील 4 लाखाहून अधिक लाभार्थीचे लसीकरण

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून गेल्या 24 तासांत 3.20 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले

Posted On: 04 MAY 2021 10:33AM by PIB Mumbai

कोविड -19  लसीकरणाचे तिसऱ्या टप्प्यातील व्यापक आणि गतिशील धोरणाची अंमलबजावणी 1 मे 2021 पासून सुरु झाली  आहे. देशभरात देण्यात आलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या मात्रांची एकूण संख्या 15.89 कोटींच्या  पुढे गेली आहे.

 12 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात 18-44 वर्षे वयोगटातील 4,06,339 लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसींची पहिली मात्रा देण्यात आली .  छत्तीसगड (1025), दिल्ली (40,028), गुजरात (1,08,191), हरियाणा (55,565), जम्मू-काश्मीर (5,587), कर्नाटक (2,353), महाराष्ट्र (73,714), ओडिशा (6,802), पंजाब (635) , राजस्थान (76,151), तामिळनाडू (2,744) आणि उत्तर प्रदेश (33,544).

आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या  अहवालानुसार एकूण 23,35,822  सत्रांद्वारे  15,89,32,921  लसीच्या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

 यामध्ये 94,48,289 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा),62,97,900 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,35,05,877  आघाडीवरील  कर्मचारी (पहिली मात्रा),   72,66,380 आघाडीवरील  कर्मचारी(दुसरी मात्रा),  18-44 वयोगटातील 4,06,339 (पहिली मात्रा ) 45 ते 60 वयोगटातल्या 5,30,50,669  (पहिली मात्रा)आणि 41,42,786  लाभार्थी (दुसरी मात्रा),  60 वर्षावरील  5,28,16,238  लाभार्थी (पहिली मात्रा), 1,19,98,443   (दुसरी मात्रा)यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.94 टक्के  मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.

लसीकरण अभियानाच्या 108  व्या दिवशी (3 मे  2021)  17,08,390  लसीकरण मात्रा देण्यात आल्या.

 8,38,343 लाभार्थींना 12,739 सत्रात पहिली मात्रा  आणि  8,70,047 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,66,13,292 इतकी आहे.

रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 81.91 टक्के आहे.गेल्या  24 तासात  3,20,289 रुग्ण बरे झाले आहेत.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 73.14% रुग्ण  दहा राज्यांमधील आहेत.

देशात घेण्यात आलेल्या एकूण चाचण्या खालीलप्रमाणे आहेत  आणि दैनंदिन  सकारात्मकतेचा दर आता 21.47% आहे

  गेल्या 24 तासात 3,57,229  नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी  71.71%  रुग्णमहाराष्ट्रकर्नाटककेरळ,  उत्तर प्रदेशदिल्ली,  तामिळनाडू प . बंगालआंध्र प्रदेश,राजस्थान छत्तीसगडया दहा राज्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 48,621  नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्याखालोखाल कर्नाटकात 44,438  तर  उत्तर प्रदेशमध्ये  29,052 नव्या रुग्णांची नोंद झाली

भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या  34,47,133  आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या  17 % आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 81.41 रुग्ण महाराष्ट्र,  कर्नाटकउत्तर प्रदेशकेरळराजस्थानगुजरात आंध्र  प्रदेशछत्तीसगडतामिळनाडूप. बंगालबिहार आणि हरियाणा या बारा  राज्यांमध्ये आहेत.

त्या प्रत्येकामध्ये 1 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण  देखील आहेत.

 

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.10% टक्के आहे.

 गेल्या 24 तासात 3,449  रुग्णांचा मृत्यू झाला

 यापैकी 73.15 टक्के  मृत्यू दहा राज्यातले  आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 567 जणांचा मृत्यू झालादिल्लीमध्ये 448 आणि उत्तर प्रदेशात 285 जणांचा मृत्यू झाला.

दोन  राज्ये / केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये  दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेलीआणि  अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

***

JPS/Susham K/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1715863) Visitor Counter : 298