PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 03 MAY 2021 7:00PM by PIB Mumbai

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

 

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

देशभरात आज 29.16 कोटींहून अधिक कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आजच्या तारखेपर्यंत एकूण 29,16,47,037 चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 1,62,93,003 रूग्ण कोविडमुक्त झाले.

रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 81.77% असून गेल्या 24 तासांत 3,00,732 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 73.49% रूग्ण हे दहा राज्यांमधील आहेत.

भारतातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 21.19% इतका आहे. गेल्या 24 तासात 3,68,147 नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 73.78 % एकूण सक्रीय रुग्ण हे महाराष्ट्र,कर्नाटक,केरळ,उत्तरप्रदेश,

दिल्ली,तामिळनाडू,पश्चिम बंगाल,आंध्रप्रदेश,राजस्थान आणि बिहार या दहा राज्यांमधील आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 56,647 रुग्णांची नोंद झाली. त्या खालोखाल कर्नाटक 37,733 आणि केरळमध्ये 31,959 नव्या रुग्णांची नोंद झाली.

आज देशभरातील उपचाराधीन सक्रीय रुग्णांची एकूण संख्या 34,13,642 वर पोहोचली आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 17.13% इतकी आहे. गेल्या 24 तासांत यामधे 63,998 अधिक सक्रीय रूग्णांची भर पडल्याची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 81.46% एकूण सक्रीय रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, केरळ, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, छत्तिसगड, तामिळनाडू,पश्चिम बंगाल, बिहार आणि हरीयाना या बारा राज्यांमध्ये आहेत राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.10 टक्के आहे आणि तो सातत्याने खाली येत आहे. देशात गेल्या 24 तासात 3,417 रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी 74.54 टक्के मृत्यू दहा राज्यात झाले आहेत. दैनंदिन होणाऱ्या मृत्यूपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक (669) जणांचा मृत्यू झाला,त्या खालोखाल दिल्लीत (407),तर उत्तरप्रदेशात 288 मृत्यू झाले.

 

इतर अपडेट्स :

 

महाराष्ट्र अपडेट्स

महाराष्ट्र : महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या कठोर निर्बंधांचा परिणाम कोविड रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी होतांना दिसत आहे. एकेकाळी कोरोना संसर्गाचा हॉट स्पॉट मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर रुग्णवाढ आटोक्यात आली असून त्यात हळूहळू आणखी सुधारणा होतांना दिसते आहे. रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर लक्षणीयरित्या कमी झाला असून गेल्या सात दिवसात यामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणांवर पडणारा ताणही कमी झाला आहे. महाराष्ट्र आजही लसीकरणात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. काल, राज्यात 592 केंद्रावरील लसीकरण सत्रात 46,693 लाभार्थ्यांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या. सध्या राज्यात लसींचा तुटवडा भासत असल्याने, गेल्या काही दिवसांत फार कमी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

FACTCHECK

 

***

M.Chopade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715740) Visitor Counter : 203