रेल्वे मंत्रालय

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांसाठी कोविड संदर्भात काळजी घेण्याकरिता रेल्वेने अतिरिक्त बोगी रवाना केल्या आहेत


आपत्तीचा सामना करण्यासाठी विलगीकरण बोगीही नंदूरबारहून पालघर इथे पाठवले आहेत

देशभरातल्या विविध भागात सध्या 191 विलगीकरण बोगी उपयोगात

राज्यांच्या वापरासाठी सुमारे 64,000 खाटा (बेड) रेल्वेने ठेवले तयार

Posted On: 01 MAY 2021 5:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मे 2021

 

कोविड विरूद्ध एकत्रित लढाईत देशाच्या क्षमता बळकट करण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने आपल्या बहुउद्देशीय पुढाकारांमधून सुमारे 4,000 विलगीकरण बोगींच्या माध्यमातून  64,000 खाटांची (बेड) व्यवस्था केली आहे.

राज्यांसमवेत एकत्रितपणे काम करण्यासाठी आणि शक्य तितक्या वेगाने कामांची पूर्तता करण्यासाठी रेल्वेने परिक्षेत्र व विभागांना बळकटी देणारी विकेन्द्रीकृत योजनी तयार केली आहे. भारतीय रेल्वेचे जाळे आहे त्या कोणत्याही भागात हे विलगीकरण बोगी सहजी पोहोचवल्या  तसेच स्थापीत केल्या  जाऊ शकतात.

विविध राज्यांच्या मागणीनुसार सध्या 191 बोगी कोविड संदर्भात काळजी घेण्यासाठी सुपूर्द केल्या  आहेत. यातल्या खाटांची(बेडची) क्षमता 2,990 आहे.

दिल्ली, महाराष्ट्र (अजनी आयसीटी, नंदूरबार), मध्य प्रदेश( तिही, इंदूर) इथे विलगीकरण बोगींचा वापर केला जात आहे. उत्तर प्रदेशातल्या महत्वाच्या शहरातही रेल्वेने 50 बोगींची व्यवस्था केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार नंदूरबार इथून विलगीकरण बोगी पालघर इथे हलवण्यात आल्या  आहेत.

जबलपूरसाठीही विलगीकरण बोगींची व्यवस्था केली आहे.

महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यासाठीच्या या बोगींची माहिती पुढील प्रमाणे -

नंदूरबार (महाराष्ट्र) इथे गेल्या दोन दिवसात सहा नवीन रुग्ण दाखल झाले तर दहा रुग्णांना विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यावर घरी सोडण्यात आले.

सध्या 43 कोविड रुग्ण संबंधित सुविधेचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत एकूण  92 रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी 57 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने कळवले आहे.  महाराष्ट्रात अजूनही 314 खाटा (बेड) उपलब्ध आहेत.

रेल्वेने दिल्लीत राज्य सरकारची मागणी पूर्ण करत 75 कोविड केअर कोच उपलब्ध केले आहेत. त्यांची 1,200 खाटांची क्षमता असून. अजूनही 1196  खाटा उपलब्ध आहेत. मध्य प्रदेश राज्य सरकारने 2 बोगींची मागणी केली होती. पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाने इंदूर जवळच्या तिही रेल्वे स्थानकानजीक  320 खाटांच्या क्षमतेच्या  22 बोगी तैनात केल्या  आहेत. भोपाळमध्ये 276 खाटांची क्षमता असलेल्या  20 बोगी तैनात आहेत.

उपरोक्त राज्यामधली सुविधेची ही माहिती ताज्या आकडेवारीवरून दिली आहे. अजूनही 2929 खाटा संबंधित सुविधांसह उपलब्ध आहेत.

 

Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1715370) Visitor Counter : 220