पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

सुधारित औद्योगिक नायट्रोजन प्रकल्पाद्वारे वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन


30 उद्योगांची निवड, ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू

Posted On: 01 MAY 2021 4:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मे 2021

 

देशातील कोविड -19 महामारीच्या स्थितीचा विचार करून आणि वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्यासाठी, केंद्र सरकारने औद्योगिक युनिटचा व्यापक डेटाबेस असलेल्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला (सीपीसीबी), राखीव नायट्रोजन प्रकल्प असलेले उद्योग शोधून विद्यमान नायट्रोजन प्रकल्पाचे रूपांतरण ऑक्सिजन निर्मितीत करण्याच्या व्यवहार्यतेचा शोध घेण्यास सांगितले होते. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एसपीसीबी) सहकार्याने सीपीसीबीने अशा संभाव्य उद्योगांची ओळख पटविली आहे, ज्यात विद्यमान नायट्रोजन प्रकल्पांना ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी राखीव ठेवले जाऊ शकते.यासाठी  संभाव्य औद्योगिक घटक आणि तज्ञांशी सल्लामसलत केली गेली आहे.

सुमारे 30 उद्योगांची निवड करण्यात आली असून वैद्यकीय ऑक्सिजनच्या उत्पादनासाठी नायट्रोजन प्रकल्प सुधारित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यापैकी काही प्रकल्प ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जवळच्या रुग्णालयात हलवले जाऊ शकतात आणि काही प्रकल्प, जेथे प्रकल्पांचे स्थलांतरण करणे शक्य नाही तेथे साइटवरच ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते.

मेसर्स यूपीएल लिमिटेडने ऑक्सिजन तयार करण्यासाठी झोलाईट मॉलिक्युलर चाळणीद्वारे 50 एनएम 3 प्रति तास क्षमतेच्या नायट्रोजन प्रकल्पाचे रुपांतर करून ते वापी (गुजरात) येथील एल जी रोटरी रुग्णालयामध्ये स्थापित केले. हा प्रकल्प दिवसाला 0.5 टन ऑक्सिजन तयार करतो आणि तो 27.04.2021 पासून कार्यरत आहे. यूपीएल लिमिटेडमध्ये आणखी तीन प्रकल्पांचे रूपांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑक्सिजन प्रकल्पांमध्ये रूपांतरण झाल्यावर सूरत आणि अंकलेश्वर येथील रुग्णालयात हे प्रकल्प स्थापित केले जातील.

विद्यमान नायट्रोजन प्रकल्पांमध्ये कार्बन मॉलिक्युलर चाळणीच्या (सीएमएस) च्या जागी झोलाइट मॉलेक्युलर चाळणी (झेडएमएस) बदलवून ऑक्सिजन अ‍ॅनालायझर बसविणे, कंट्रोल पॅनेल सिस्टममध्ये बदल, फ्लो व्हॉल्व्ह इत्यादी बदल करून काही ऑक्सिजन फर्म तयार केले जाऊ शकतात. झेडएमएसच्या उपलब्धतेमुळे, अशा सुधारित प्रकल्पांची स्थापना 4-5 दिवसात होऊ शकते तर नवीन ऑक्सिजन प्रकल्पांच्या स्थापनेस किमान 3-4 आठवडे लागू शकतात.

प्रत्यक्ष साइटवरील प्रकल्पांमध्ये तयार होणाऱ्या ऑक्सिजनला कॉम्प्रेस करून सिलिंडर / विशेष पात्रांमध्ये भरावे लागते जेणेकरुन रुग्णालयात नेण्यासाठी उच्च दाब कॉम्प्रेसरचा वापर करावा लागतो. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी या उद्योगांनाक आवश्यक ती  सुविधा पुरविली जात आहे.

मेसर्स यूपीएल लिमिटेडद्वारे वापी (गुजरात) येथील एल जी रोटरी रुग्णालयामध्ये स्थापित वैद्यकीय ऑक्सिजन तयार करण्यासाठी सुधारित नायट्रोजन प्रकल्प दि. 27.04.2021 पासून कार्यरत आहे.

 

Jaydevi PS/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1715342) Visitor Counter : 308