अर्थ मंत्रालय

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी (एसडीआरएफ) 8873.6 कोटी रुपयांच्या पहिल्या हफ्त्याचे आगाऊ वितरण .


कोविड -19 प्रतिबंधित क्षेत्र उपाययोजनांसाठी यातील 50 टक्के एसडीआरएफ निधीचा करता येईल वापर.

Posted On: 01 MAY 2021 8:55AM by PIB Mumbai

विशेष वितरण म्हणून, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार वित्त विभागाच्या, व्यय विभागाने सन 2021-22 च्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचा (एसडीआरएफ) पहिला हप्ता राज्यांना दिला आहे. केन्द्राने आपल्या वाट्यातला हा निधी सर्व राज्यांना आगाऊ दिला असून तो एकूण 8873.6 कोटी रुपये आहे

साधारणत: एसडीआरएफचा पहिला हप्ता वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जून महिन्यात दिला जातो. तथापि, सामान्य कार्यपद्धतीत शिथिलता आणून केवळ एसडीआरएफचा निधी जाहीर केला नाही तर, राज्यांनी गेल्या वर्षीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्याची वाट न बघता त्यांना ही रक्कम वर्गही करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या रकमेच्या 50% पर्यंत म्हणजेच 4436.8 कोटी रुपये कोविड -19 प्रतिबंधित क्षेत्र उपाययोजनांसाठी राज्ये वापरु शकतात.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत प्राप्त झालेला निधी कोविड -19ला प्रतिबंध करण्याच्या विविध उपाययोजनांसाठी राज्ये वापरु शकतात. या अंतर्गत रुग्णालयांमध्ये प्राणवायू निर्मीती आणि साठवणूक प्रकल्प सुरु करणे, कृत्रिम जीवरक्षक प्रणाली ( व्हेंटिलेटर) ,हवा शुद्ध करणारी उपकरणे, रुग्णवाहीका व्यवस्था बळकट करणे, कोविड19 रुग्णालये, कोविड रुग्णांसाठी काळजीवाहू केन्द्र, उपयोगी उपकरणे, तापमापक ( थर्मल स्कॅनर), वैयक्तीक जीवरक्षक उपकरणे, चाचणी प्रयोगशाळा, चाचणी किट, प्रतिबंधित क्षेत्र इत्यादि सोई सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात .

***

 JPS/VG/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1715286) Visitor Counter : 328