आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सौम्य आणि लक्षणविरहित कोविड-19 रुग्णांसाठी गृह-अलगीकरणासाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

Posted On: 30 APR 2021 3:32PM by PIB Mumbai

 

कोविड-19 महामारीला प्रतिसाद आणि व्यवस्थापनात केंद्र सरकार सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसोबत समन्वय आणि सहकार्य करत या लढाईचे नेतृत्व करत आहे. कोविड प्रतिबंधन, संसर्ग रोखणे आणि व्यवस्थापनासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. याच मालिकेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सौम्य आणि लक्षणविरहित कोविड-19 रुग्णांसाठी गृह-अलगीकरणासाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्यामुळे याआधी, म्हणजेच 2 जुलै 2020 रोजी जारी करण्यात आलेल्या सूचना रद्दबातल ठरल्या आहेत.

सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्या कोविड रुग्णांना आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत अथवा अगदी सौम्य लक्षणे आहेत, अशा रूग्णांना गृह-अलगीकरणात राहण्याची शिफारस करण्यात आली आहे.

 

लक्षणविरहीत कोविड रुग्ण :-

लक्षणविरहित कोविड रुग्ण म्हणजे, कोविड संसर्ग झाला असलेले मात्र कोणतीही लक्षणे जाणवत नसलेले तसेच ऑक्सिजनची पातळी खोलीमध्ये 94 टक्के पेक्षा जास्त असलेले रुग्ण. तसेच वैद्यकीय परिभाषेत, सौम्य लक्षणे असलेले रुग्ण म्हणजे ज्यांच्या श्वसननलिकेच्या वरच्या भागात संसर्गाची सौम्य लक्षणे( किंवा/आणि ताप) आहे. मात्र, श्वास घेण्यास अडचण नाही तसेच ऑक्सिजनची पातळी खोलीत 94 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, असे रुग्ण.

1. गृह-अलगीकरणासाठी पात्र रुग्ण

  1.  

i. रुग्णावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना वैद्यकीय दृष्ट्या सौम्य/लक्षणविरहीत रुग्ण असल्याचे प्रमाणित करायला हवे.

ii. अशा रुग्णांच्या घरी त्यांना स्वयं-अलगीकरणासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध असाव्यात, तसेच इतर कुटुंबियांना अलगीकरणात राहण्याची देखील सुविधा हवी.

iii. अशा रुग्णांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी व्यक्ती चोवीस तास उपलब्ध असावेत. तसेच, काळजी घेणारी व्यक्ती आणि रुग्णालये/डॉक्टर यांच्यात रुग्णांच्या संपूर्ण गृह-अलगीकरणाच्या काळात संपर्क असण्याची पूर्वअट असेल.

iv. 60 वर्षे वयावरील व्यक्ती किंवा ज्यांना इतर काही सहव्याधी आहेत, जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुसे/यकृत/मूत्रपिंडाचे जुनाट आजार, मज्जासंस्थेशी निगडित आजार, असलेल्या रूग्णांची डॉक्टरकडून संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्याना गृह-अलगीकरणाची परवानगी दिली जाऊ शकते.

v. ज्या रुग्णांना रोगप्रतिकारशक्ती कमी/करणारे, त्यावर आघात करणारे आजार आहेत ( HIV, अवयव प्रत्यारोपण, कर्करोग इत्यादी) अशा रूग्णांना गृह-अलगीकरणात ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली नाही. त्यांच्या डॉक्टरकडून संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच त्याना गृह-अलगीकरणाची परवानगी दिली जाऊ शकते.

vi. अशा रुग्णांची काळजी घेणाऱ्या आणि त्यांच्याशी संपर्क येणाऱ्या सर्व व्यक्तींनी प्रोटोकॉल नुसार आणि डॉक्टरच्या शिफारसीनुसार, हायड्रोक्सिंक्लोरोक्वीन प्रोफायलैक्सीस औषध घ्यायला हवे.

vii. त्याशिवाय, गृह-अलगीकरणा असलेल्या रुग्णांसोबतच्या इतर व्यक्तींसाठीच्या मार्गदर्शक सूचना : https://www.mohfw.gov.in/pdf/Guidelinesforhomequarantine.pdf, या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

2. रूग्णांसाठीच्या सूचना :

  1.  

i. रुग्णाने स्वतःला घरातील इतर व्यक्तींपासून विलग करावे. एकाच निश्चित खोलीत आणि इतर लोकांशी संपर्क येणार नाही, अशा जागी राहावे. विशेषतः घरातील वयोवृद्ध लोक आणि इतर आजार असलेल्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवावे.

ii. रुग्ण असलेल्या खोलीत हवा खेळती रहायला हवी, तसेच खिडक्या सतत उघड्या ठेवायला हव्यात, जेणेकरून, खोलीत ताजी हवा येऊ शकेल.

iii. रुग्णाने पूर्णवेळ ट्रिपल लेअर वैद्यकीय मास्क लावावा. प्रत्येक 8 तासांनंतर किंवा तो ओला झाला असल्यास मास्क बदलावा. जर काळजी घेणारी व्यक्ती खोलीत प्रवेश करणार असेल, तर त्या व्यक्तीने आणि रुग्णानेही N 95 मास्क लावावा.

iv. 1 टक्का सोडियम हायपोक्लोराईट असलेल्या द्रवाने निर्जंतुक केल्यानंतरच मास्क फेकला जावा.

v. रूग्णाने भरपूर विश्रांती घ्यावी आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी द्रवरूप पदार्थ प्यावेत.

vi. पूर्ण वेळ श्वसनाचे सगळे नियम पाळले जावेत.

vii. साबण आणि पाण्याने किमान 40 सेकंद वारंवार हात धुवावे. किंवा अल्कोहोल युक्त सॅनिटायझरने स्वच्छ करावेत.

viii. आपल्या वैयक्तिक वापराच्या वस्तू घरातील कोणालाही वापरु देऊ नयेत.

ix. खोलीतील ज्या भागाला/वस्तूंना रुग्णाचा वारंवार स्पर्श होतो, अशा वस्तू (टेबल, दार, हैंडल्स वगैरे) 1 टक्का सोडियम हायपोक्लोराईट द्रवाने स्वच्छ कराव्यात.

x. रक्तातील ऑक्सिजनची पातळी ऑक्सिमीटरच्या मदतीने रुग्णाकडूनच वारंवार तपासली जावी, अशी आग्रही शिफारस करण्यात येत आहे.

xi. रुग्णाने स्वतःच रोज आपला ताप तपासावा आणि त्यात खाली दिलेल्या तक्त्यानुसार काही बदल लक्षात आल्यास ताबडतोब त्याची माहिती काळजी घेणाऱ्या व्यक्तीला द्यावी.

 

निरीक्षण तक्ता

 

लक्षणे दिसलेला पहिला दिवस आणि वेळ (प्रत्येक चार तासांनंतर)

 

 

तापमान

 

हृदयाचे ठोके (पल्स ऑक्सिमीटरवर )

 

SpO2 % (पल्स ऑक्सिमीटरवर)

 

रूग्णाची स्थिती : (चांगली /तशीच

/वाईट )

 

श्वसन : (चांगले / तसेच / वाईट

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

3. काळजी घेणाऱ्या व्यक्तीसाठीच्या सूचना

1.

i. मास्क :

· काळजी घेणाऱ्या व्यक्तीने ट्रिपल लेअर अर्हत तीन पदरी वैद्यकीय मास्क घालावा. जेव्हा रुग्णाच्या खोलीत जायचे असेल तेव्हा N95 मास्क घातला जावा.

· मास्कच्या समोरच्या भागाला वापरादरम्यान हात लावू नये.

· मास्क जर ओला झाला, किंवा अस्वच्छ झाला तर तो त्वरित बदलावा जावा.

· वापरानंतर मास्क नष्ट करावा आणि मास्क काढल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.

· त्या व्यक्तीने आपल्या चेहऱ्याला, नाकाला आणि तोंडाला हात लावू नये.

1.

ii. हातांचे निर्जंतुकीकरण :

· आजारी व्यक्तीशी संपर्क आल्यावर किंवा त्याच्या आसपास गेल्यावर ताबडतोब हातांची स्वच्छता केलीच पाहिजे.

· अन्न शिजवण्याआधी आणि नंतर हात स्वच्छ धुतले पाहिजेत, जेवणापूर्वी, शौचालय वापरण्यापूर्वी आणि नंतर आणि जेव्हा जेव्हा हात अस्वच्छ झाले असतील तेव्हा ते स्वच्छ केले जावेत.

· हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याचा वापर करत किमान 40 सेंकद हात धुवावेत किंवा अल्कोहोल युक्त द्रव वापरावे.

· साबण आणि पाण्याचा वापर केल्यावर हात कोरडे करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करावा. जर तो उपलब्ध नसेल, तर एकच नैपकिन/टॉवेल वापरला जावा. आणि तो ओला झाल्यावर लगेच बदलावा.

· हातमोजे घालण्यापूर्वी आणि घातल्यानंतर हातांची संपूर्ण स्वच्छता करावी.

 

1

iii. रूग्ण / रुग्णाच्या आजूबाजूच्या वातावरणाशी संपर्क

o रुग्णाच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रवपदार्थाशी थेट संपर्क टाळा, विशेषत: तोंडातून किंवा श्वासाद्वारे बाहेर पडणारे थेम्ब. रुग्णाला हाताळताना फेकून देण्याजोगे हातमोजे वापरा.

o त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील संभाव्य दूषित वस्तूंचा संपर्क टाळा (उदा. सिगारेट सामायिक करणे, जेवणाची भांडी, डिश, पेये, वापरलेले टॉवेल्स किंवा चादरी टाळा).

o रूग्णाला त्याच्या खोलीत जेवण दिले जावे. रूग्णाने वापरलेली भांडी आणि ताटे साबण / डिटर्जंट आणि पाण्याने मोजे वापरून स्वच्छ धुवावीत. भांडी आणि ताटे पुन्हा वापरली जाऊ शकतात.

हातमोजे काढून टाकल्यानंतर किंवा रुग्णांनी वापरलेल्या वस्तू हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुवा. रुग्णाने वापरलेले पृष्ठभाग, कपडे किंवा चादरी यांची साफसफाई करताना किंवा हाताळताना ट्रिपल लेयर मेडिकल मास्क आणि डिस्पोजेबल ग्लोव्ह्ज वापरा.

हातमोजे घालण्यापूर्वी आणि काढल्यानंतर हाताची स्वच्छता राखा

1

iv. बायोमेडिकल अर्थात जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणे

घरात संसर्गाचा आणखी प्रसार रोखण्यासाठी कचर्‍याची प्रभावीपणे विल्हेवाट सुनिश्चित करा. सीपीसीबीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार (यावर उपलब्ध: http://cpcbenvis.nic.in/pdf/1595918059_mediaphoto2009.pdf) कचऱ्याची (मास्क, डिस्पोजेबल वस्तू , अन्नपदार्थांची पॅकेट्स इ.) विल्हेवाट लावावी

4. गृह अलगीकरणात असलेल्या सौम्य / लक्षणे नसलेल्या रूग्णांवर उपचार

1

i . रूग्णांनी त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांशी संवाद साधला पाहिजे आणि तब्येतीत काही बिघाड झाल्यास त्यांना त्वरित सांगायला हवे

ii. उपचार करणार्‍या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर इतर सह-व्याधी / आजारासाठी औषधे सुरू ठेवा.

iii. ताप, वाहणारे नाक आणि खोकला यासाठी रुग्णांनी लक्षणांचे व्यवस्थापन करणे.

iv. रुग्ण दिवसातून दोनदा गरम पाण्याने गुळण्या किंवा वाफ घेऊ शकतात.

v. गोळ्यांच्या कमाल डोसद्वारे ताप नियंत्रित झाला नाही तर पॅरासिटामॉल 650 मिलीग्राम दिवसातून चार वेळा द्या तसेच जे नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग (एनएसएआयडी) सारख्या इतर औषधांचा सल्ला देऊ शकतात. (उदा. टॅब. नेप्रोक्सेन 250 मिलीग्राम दिवसातून दोनदा), असा उपचार करणार्‍या डॉक्टरांचा सल्ला घ्या ..

vi. टॅब व्हर्मेक्टिन (दिवसातून एकदा 200 एमसीजी /केजी , रिकाम्या पोटी घ्यावे) 3 ते 5 दिवस.

1

vii. जर रोगाच्या सुरुवातीच्या 5 दिवसांनंतर लक्षणे (ताप आणि / किंवा खोकला) कायम राहिल्यास इनहेलेशनल बुडेसोनाइड ( 5 ते 7 दिवस दररोज दोनदा 800 एमसीजी डोस स्पेसरसह इनहेलर्सद्वारे ) देणे

viii. रेमडेसीवीर किंवा इतर कोणत्याही तपासणी थेरपीबाबत निर्णय वैद्यकीय व्यावसायिकांनीच घेतला पाहिजे आणि तो फक्त रुग्णालयातच अंमल केला जाणे आवश्यक आहे. घरी रेमडेसीवीर खरेदी करण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न करू नका.

ix. सौम्य आजारामध्ये सिस्टीमिक ओरल स्टेरॉइड्स आवश्यक नाहीत. जर लक्षणे 7 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिली (सतत ताप येणे, खोकला वाढणे इ.) तर ओरल स्टिरॉइड्ससह उपचार करणार्‍या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

x ऑक्सिजन पातळी घसरत असल्यास किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे आणि त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर / देखरेख पथकाचा त्वरित सल्ला घ्यावा.

 

5.. वैद्यकीय मदत कधी घ्यावी

रुग्ण / काळजी घेणारा त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवेल. गंभीर चिन्हे किंवा लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. यात पुढील बाबी समाविष्ट असू शकतात -

1

i . श्वास घेण्यात अडचण,

ii. ऑक्सिजन पातळी घसरणे (खोलीच्या हवेत SpO2 94हून कमी )

iii. छातीत सतत वेदना / दाब जाणवणे ,

iv. मानसिक गोंधळ

 

6. गृह अलगीकरण कधी बंद करावे

लक्षणे दिसू लागल्यानंतर कमीतकमी 10 दिवस झाल्यानंतर (किंवा लक्षणे नसलेल्या नमुन्याच्या तारखेपासून) आणि 3 दिवस ताप नसेल तर गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णाचे अलगीकरण संपेल

गृह अलगीकरण कालावधी संपल्यानंतर चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

 

7. राज्य / जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची भूमिका

1

i . राज्ये / जिल्ह्यांनी गृह अलगीकरणात असलेल्या सर्व रुग्णांवर देखरेख ठेवली पाहिजे.

ii. गृह अलगीकरणात असलेल्या लोकांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत दररोज रुग्णांचा पाठपुरावा करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी / देखरेख पथकांनी वैयक्तिक भेटीद्वारे समर्पित कॉल सेंटरसह परीक्षण केले पाहिजे.

iii. प्रत्येक घटनेची नैदानिक स्थिती फील्ड स्टाफ / कॉल सेंटर (शरीराचे तापमान, नाडीचा दर आणि ऑक्सिजन संपृक्तता) द्वारे नोंदवली जाईल. फील्ड स्टाफ पॅरामीटर्स मोजण्यासाठी रुग्णाला मार्गदर्शन करतील आणि सूचना देतील (रुग्ण आणि त्यांची देखभाल करणार्‍यांसाठी) गृह अलगीकरणात असलेल्यांवर दररोज देखरेख ठेवण्याची ही यंत्रणा काटेकोरपणे पाळली पाहिजे.

iv. कोविड -19 पोर्टल आणि सुविधा अ‍ॅपवर (डीएसओ वापरणारे म्हणून) गृह अलगीकरण अंतर्गत रूग्णांविषयीचे तपशील देखील अद्ययावत केले जावेत. वरिष्ठ राज्य व जिल्हा अधिका्यांनी नोंदी अद्ययावत करण्यावर देखरेख ठेवली पाहिजे.

v. उल्लंघन झाल्यास किंवा उपचारांची गरज भासल्यास रुग्णाला हलवण्याची यंत्रणा स्थापन करुन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेशी समर्पित रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केली जावी . त्यासाठी समाजमाध्यमातून व्यापक प्रसिद्धी दिली जावी.

vi. फील्ड स्टाफद्वारे नियमांनुसार कुटुंबातील सर्व सदस्य आणि जवळच्या संपर्कांत आलेल्यांची देखरेख आणि चाचणी केली जाईल.

***

Jaydevi PS/R.Aghor/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1715055) Visitor Counter : 386