रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतांना प्रवासी वाहनांसाठी पुनर्नोंदणी नियम सुलभ करण्याचा प्रस्ताव
प्रविष्टि तिथि:
28 APR 2021 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2021
केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर करतांना प्रवासी वाहनांसाठी पुनर्नोंदणी नियम सुलभ करण्याविषयीच्या मसुद्याची अधिसूचना जारी केली आहे. यामुळे वाहनधारकांना दुसरीकडे ही नोंदणी करणे सोपे जाईल. केंद्र सरकारने याआधीही वाहन नोंदणीसाठी अनेक नागरिक-पूरक धोरणे राबवली आहेत. मात्र त्यात एक मुद्दा राहिला होता, तो म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या वाहनांची नोंदणी.
यासाठी रस्ते महामार्ग आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन नोंदणीचा नवा प्रस्ताव मांडला आहे. ज्या अंतर्गत, वाहनांची नोंदणी “IN” मालिकेत केली जाईल आणि सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर हे केले जाईल. “IN series”मधली ही वाहन नोंदणी संरक्षण अधिकारी/कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी, राज्य सरकार, केंद्र/राज्यांच्या अशा सार्वजनिक कंपन्या तसेच खाजगी कंपन्या/संस्था ज्यांची कार्यालये पाच किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये आहेत. अशा वाहनांवरचा मोटर वाहन कर दोन वर्षांसाठी किंवा दोनदा आकाराला जाईल. या योजनेमुळे, कोणीही नव्या राज्यांत स्थलांतर केल्यास, अशा व्यक्तींची खाजगी वाहने, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विनासायास प्रवास करू शकतील.
या नियमावलीचा मसुदा संकेतस्थळावर टाकण्यात आला असून, त्यावर, 30 दिवसांच्या आत सूचना/हरकती मागवण्यात आल्या आहेत.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1714722)
आगंतुक पटल : 265