संरक्षण मंत्रालय

कोविड-19 रुग्णवाढीचा सामना करतांना माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यसेवा देण्यासाठी रुग्णभार असलेल्या 51 ईसीएचआय सर्वोपचार रुग्णालयांमध्ये कंत्राटी स्वरूपात अधिक कर्मचारी घेण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी

Posted On: 27 APR 2021 10:56AM by PIB Mumbai

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या सातत्याने वाढ असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना पुरेशा आरोग्यसुविधा मिळाव्यात, या दृष्टीने, देशभरातील 51 पेक्षा जास्त ECHS म्हणजेच माजी सैनिक योगदान आरोग्य सुविधा सर्वोपचार रुग्णालयांमध्ये कंत्राटी स्वरूपात कर्मचारी भरती करण्याच्या प्रस्तावाला आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली. या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये एक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मसिस्ट, वाहनचालन आणि चौकीदार अशा पदांचा समावेश असून निवडक ECHS रुग्णालयांमध्ये विभागीय मुख्यालयांकडून तीन महिन्यांसाठी रात्रपाळीत काम करण्यास ही पदभरती केली जाणार आहे.

रुग्णसंख्या अधिक असलेली ECHS सर्वोपचार रुग्णालये, लखनौ, दिल्ली छावणी, बंगळूरु(शहर), देहरादून, कोटपुटली, अमृतसर, मेरठ, चंदिगढ, जम्मू, नवी दिल्ली, सिकंदराबाद, आग्रा, अंबाला, ग्रेटर नोयडा, गुरुदासपूर, पुणे, त्रिवेंद्रम, जालंधर, कानपूर, गुडगाव, होशियारपूर, मोहाली, चांदीमंदिर, अलाहाबाद, गाजियाबाद, पठाणकोट, जोधपूर, लुधियान, रोपर, तरणतारण, कोलकाता , दानापूर, खडकी(पुणे), पालमपूर, बरेली, कोल्हापूर, योल, दक्षिण पुणे( लोहगाव), विशाखापट्टणम, जयपूर, गुंटूर, बराकपूर, चेन्नई, गोरखपूर, पतियाला, नोएडा, भोपाल, कोची, वेल्लोर आणि रांची येथे आहेत.

या निर्णयामुळे या रुग्णालयात जवळपासच्या माजी सैनिक आणि कुटुंबियांना रात्री देखील आरोग्य सुविधा आणि सेवा मिळू शकतील. ही मंजुरी 15 ऑगस्ट 2021 पर्यंत लागू असेल.  

***

MI/RA/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1714329) Visitor Counter : 188