रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वे येत्या 24 तासांमध्ये 140 मेट्रीक टनांहून जास्त द्रवरुप प्राणवायूचे वितरण करणार


70 मेट्रीक टन द्रवरूप प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वेगाडी आज दिल्लीला जाण्यास निघणार

शक्य त्या सर्व मार्गांनी प्राणवायू वाहतूकीचे रेल्वेचे नियोजन

फलाट आणि बोगी तयार

Posted On: 25 APR 2021 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2021

सध्याच्या परिस्थितीत युध्दपातळीवर काम करत असलेली भारतीय रेल्वे येत्या 24 तासांमध्ये 140 मेट्रीक टनांहून जास्त द्रवरुप प्राणवायूचे वितरण करणार आहे. त्यापैकी 9 टँकर्स आधीच निघाले आहेत, त्यापैकी 5 आज रात्री लखनौला पोहोचतील आणि उरलेले चार टँकर्स बोकारोहून निघाले असून ते  उद्यापर्यंत लखनौला पोहोचतील.

आतापर्यंत नागपूरमार्गे मुंबई ते विशाखापट्टनम ते नाशिक आणि लखनौ ते बोकोरो आणि तेथून परतीचा प्रवास ऑक्सिजन एक्स्प्रेसने केला आहे. आतापर्यंत ऑक्सिजन एक्स्प्रेसने जवळपास 150 टन द्रवरूप प्राणवायूचे एकूण 10 कंटेनरची  वाहतूक केली आहे.

त्यापैकी 9 टँकर्स आधीच निघाले आहेत, त्यापैकी 5 आज रात्री लखनौला पोहोचतील आणि उरलेले चार टँकर्स बोकारोहून निघाले असून उद्यापर्यंत लखनौला पोहोचतील.

70 मेट्रीक टन द्रवरूप प्राणवायू भरलेले 4 टँकर्स असलेली एक ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वेगाडी आज छत्तीसगढ़मधील रायगढ़हून दिल्लीला जाण्यास निघेल.

दिल्ली सरकारला रस्ते मार्गाने जाणारे प्राणवायू टँकर्स मिळवण्याच्या सूचना रेल्वेने केली आहे. ऑक्सिजन कंटेनर्सची कंटेनर वॅगनने दुर्गापूर ते दिल्ली अशी वाहतूक करण्याची तयारी रेल्वेने दर्शवली आहे.

खालील मार्गांवरून प्राणवायूच्या वाहतूकीला रेल्वे संपूर्णपणे तयार आहे:

महाराष्ट्रात द्रवरूप प्राणवायू पोचवण्यासाठी जामनगरहून मुंबईला तसेच नागपूर व पुणे येथे विशाखापट्टनम /अंगुल येथून प्राणवायूची वाहतूक करण्याचे नियोजन भारतीय रेल्वेने केले आहे.

तेलंगणाला वैद्यकीय वापराचा द्रवरूप प्राणवायू पोचवण्यासाठी अंगूल ते सिकंदराबाद मार्गावरून वाहतूक करण्याचे नियोजन भारतीय रेल्वेने केले आहे.

आंध्रप्रदेशात द्रवरूप प्राणवायू पुरवण्यासाठी अंगूल ते विजयवाडा हा मार्ग रेल्वेने निश्चित केला आहे.

मध्यप्रदेशात द्रवरूप प्राणवायू वाहतूकीसाठी भारतीय रेल्वे जमशेदपूर ते जबलपूर हा मार्ग वापरेल.

द्रवरूप प्राणवायू हा कमी तापमानाला वाहतूक करावा लागणारा असा घटक असल्यामुळे  तो वाहून नेण्यासाठीचा सर्वाधिक वेग, चढ-उताराच्या वेळी घ्यावी लागणारी काळजी, विशेष फलाट व डबे, द्रवरूप प्राणवायू टँकर्सची उपलब्धता, अश्या अनेकविध मर्यादा येतात.  वाटेतील रेल्वेमार्गाखालील पूल तसेच पादचारी पूल यांची संख्या लक्षात घेऊन वाहतूक करताना हे मार्ग जास्तीत जास्त मोकळे राहतील असे नियोजन केले जात आहे.

 

 

 

 

Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1713997) Visitor Counter : 164