पोलाद मंत्रालय
पोलाद क्षेत्रातील कंपन्या देशात वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याला मदत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत;
पोलाद क्षेत्राने काल 3,474 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन केले;
लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि ते वितरीत करण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत
Posted On:
25 APR 2021 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2021
पोलाद मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि पोलाद क्षेत्रातील इतर खाजगी कंपन्या या संकटाच्या काळात देशाबरोबर आहेत आणि लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पूरक प्रयत्न करत आहेत.
पोलाद कारखान्यांची एकूण दैनंदिन ऑक्सिजन उत्पादन क्षमता 2834 मेट्रिक टन आहे. पोलाद क्षेत्रात 33 ऑक्सिजन प्रकल्प आहेत (सार्वजनिक आणि खासगी दोन्ही) यापैकी 29 नियमितपणे वापरले जातात. पोलाद क्षेत्रात दररोज 2,834 मेट्रिक टन उत्पादन क्षमतेच्या तुलनेत 24 एप्रिल 2021 रोजी लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनचे चे उत्पादन 3474 मेट्रिक टन नोंदले गेले. हे एलएमओ उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त आहे, कारण बहुतेक कारखान्यांनी नायट्रोजन आणि आर्गॉनचे उत्पादन कमी केले आहे आणि केवळ एलएमओ उत्पादन करत आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे, यापूर्वीच्या आठवड्यात 1500/1700 टन / दररोजच्या तुलनेत सार्वजनिक आणि खाजगी पोलाद प्रकल्पांमार्फत 24 एप्रिल रोजी वेगवेगळ्या राज्यात 2,894 टन ऑक्सिजन पाठविण्यात आले.
पोलाद प्रकल्पाना प्रामुख्याने स्टील तयार करण्यासाठी आणि ब्लास्ट फर्नेसेसमध्ये ऑक्सिजन संवर्धनासाठी, गॅसयुक्त ऑक्सिजनची आवश्यकता असते म्हणूनच इंटिग्रेटेड स्टील प्लांट्स मधील कॅप्टिव्ह ऑक्सिजन प्लांट्सची रचना ऑक्सिजन, नायट्रोजन आणि ऑरगॉनची प्रामुख्याने वायू उत्पादने तयार करण्यासाठी केली आहे आणि नंतर इच्छित दाबाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रेशर रिडक्शन अँड मॅनेजमेंट सिस्टम (पीआरएमएस) द्वारे केली जातात. असे प्रकल्प क्षमतेपेक्षा 5-6% जास्त लिक्विड ऑक्सिजन (एलओएक्स) तयार करू शकतात, जे औद्योगिक ऑक्सिजनच्या तुलनेत अत्यंत शुद्ध उत्पादन आहे.
यादरम्यान, द्रव ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि वितरीत करण्यासाठी खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील सर्व ऑक्सिजन प्रकल्प 24x7 कार्यरत आहेत. पोलाद प्रकल्प ऑक्सिजन सिलिंडर भरत आहेत आणि राज्ये / रुग्णालयाना पुरवत आहेत.
सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील पोलाद कंपन्या वेगवेगळ्या राज्यांना लिक्विड ऑक्सिजन पुरवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. सेलद्वारे लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनचे सरासरी वितरण दररोज 800 टनांपेक्षा जास्त झाले आहे. 23 एप्रिल रोजी सुमारे 1150 टन एलएमओ वितरित झाला होता आणि काल वितरीत केलेली मात्रा 960 टन होती. सेल एलएमओ पुरवठा सातत्याने वाढवत आहे. ऑगस्ट २०२० पासून भिलाई, बोकारो, रुरकेला, दुर्गापूर आणि बर्नपूर येथील सेल इंटीग्रेटेड स्टील कारखान्यांमधून कालपर्यंत पुरवठा केलेला एकूण लिक्विड मेडिकल ऑक्सिजन 39,, 647 टन झाला आहे.
मागील आर्थिक वर्षात 20-21 मध्ये आरआयएनएलने 8842 टन एलएमओ पुरवठा केला होता. 13 एप्रिलपासून आज सकाळपर्यंत 1300 टनांपेक्षा जास्त वैद्यकीय ऑक्सिजन पाठवण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत 100 टनावरून 140 टनांपर्यंत वाढ झाली आहे. पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस 22 एप्रिल रोजी आरआयएनएल विशाखापट्टणम स्टील प्लांट इथून महाराष्ट्रात कोविड रूग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी 100 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन घेऊन निघाली होती.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1713968)
Visitor Counter : 243