माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतीय माहिती सेवेतील वरिष्ठ अधिकारी मणिकांत ठाकूर यांचे निधन
भारतीय माहिती सेवेतील समुहाने वरिष्ठ आयआयएस अधिकारी नरेंद्र कौशल यांचेही स्मरणही केले आहे, जे गेल्या आठवड्यात कोरोनाविरूद्ध लढाई हरले होते
प्रविष्टि तिथि:
25 APR 2021 3:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2021
भारतीय माहिती सेवेतील ज्येष्ठ अधिकारी मणिकांत ठाकूर यांचे कोविड -19 च्या संसर्गामुळे आज पहाटे निधन झाले. त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ठाकूर यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात मुख्य माध्यम अधिकारी म्हणून कार्यभार पहात होते. भारतीय माहिती सेवेतील त्यांच्या 30 वर्षांच्या उत्कृष्ट कारकीर्दीत त्यांनी माहिती आणि प्रसारण (आय अँड बी )मंत्रालयातील विविध विभाग ज्यात, ब्युरो ऑफ आऊटरीच अँड कम्युनिकेशन )विभाग तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे वृत्त सेवा विभाग यांचा समावेश होता. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे प्रादेशिक वृत्तविभाग प्रमुख म्हणून त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली होती.
ठाकूर यांच्या निधनाबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालय, आकाशवाणी आणि दूरदर्शनचा वृत्त सेवा विभाग तसेच प्रेस क्लब ऑफ इंडिया येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.
वरिष्ठ आयआयएस अधिकारी,अतिरिक्त महानिदेशक, उत्तराखंड नरेंद्र कौशल यांचेही आयआयएस समुहाने स्मरण केले आहे,ज्यांचे 18 एप्रिल रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान एम्स, ऋषिकेश येथे कोरोनाविरूद्धच्या लढ्यात निधन झाले.
दोन्ही अधिकारी त्यांच्या व्यावसायिक कार्यक्षमतेसाठी आणि जनसेवेसाठी केलेल्या समर्पणामुळे सदैव स्मरणात राहतील.

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1713955)
आगंतुक पटल : 221