संरक्षण मंत्रालय
एअर व्हाइस मार्शल आशुतोष शर्मा यांनी लिहिलेल्या कथित व्हॉट्सअप संदेशाबाबत स्पष्टीकरण
प्रविष्टि तिथि:
25 APR 2021 3:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2021
कमांड हॉस्पिटल एअर फोर्स, बंगळुरू (सीएचएएफबी) चे कथित एअर मार्शल आशुतोष शर्मा यांच्या नावाने एक व्हॉट्सअप मजकूर सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे, ज्यात कोविड -19 महामारीचा सामना करण्यासाठी वाफ उपयुक्त असल्याचा दावा केला आहे.
याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे की, बंगळुरू येथे एअर मार्शल आशुतोष शर्मा नाहीत. कमांड हॉस्पिटल एअर फोर्स बंगळुरुचे प्रमुख एअर व्हाईस मार्शल आशुतोष शर्मा आहेत आणि त्यांनी असा संदेश पाठवलेला नाही.
संदेशात म्हटल्या गेलेल्या कोणत्याही गोष्टीचे भारतीय हवाई दल आणि एअर व्हाईस मार्शल आशुतोष शर्मा समर्थन करत नाहीत. कोविड-19 ची कोणतीही लक्षणे असलेल्या कोणत्याही व्यक्तीने उपचारांसाठी व्यावसायिक वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
S.Thakur/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1713951)
आगंतुक पटल : 321