रसायन आणि खते मंत्रालय
रेमडीसिवीरच्या उत्पादनासाठी 25 नवीन उत्पादन केंद्रांना मंजूरी
रेडमिसिवीरच्या उत्पादनात वाढ, दरमहा 40 लाखांवरून 90 लाख कुप्यांचे उत्पादन लवकरच उत्पादन प्रतिदिन 3 लाख कुप्यांवर पोहोचेल
प्रविष्टि तिथि:
23 APR 2021 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2021
रेमडीसिवीरच्या उत्पादनासाठी 12 एप्रिल पासून 25 नवीन उत्पादन केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे असे रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी सांगितले.
“उत्पादन क्षमतेत आता दरमहा 90 लाख कुप्यांपर्यंत वाढ झाली आहे, पूर्वी दर महिन्याला 40 लाख कुप्यांचे उत्पादन होत होते. लवकरच दिवसाला 3 लाख कुप्यांचे उत्पादन होईल. या कामावर दररोज देखरेख केली जात आहे. रेमडीसीवरचा पुरवठा करण्यात आम्ही कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही,” असे ते म्हणाले.
* * *
S.Patil/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1713662)
आगंतुक पटल : 296