संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या कारवाईत 3000 कोटी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त
Posted On:
19 APR 2021 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 एप्रिल 2021
अरबी समुद्रात गस्त घालत असताना भारतीय नौदलाच्या सुवर्णा या जहाजाने एका मच्छिमार नौकेवर केलेल्या कारवाईत 300 किलोग्रॅमहून अधिक अमली पदार्थ जप्त केले. या नौकेच्या संशयास्पद वावरामुळे सुवर्णा या जहाजावरील नौदलाच्या चमूने या नौकेवर उतरून तपासणी केल्यावर त्यावर हे अंमली पदार्थ सापडले.
ती बोट आणि त्यातील कर्मचाऱ्यांना पकडून भारतातील कोची या केरळमधील जवळच्या बंदरावर पुढील तपासणी करण्यासाठी नेण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 3000 कोटी रुपये आहे. ही कारवाई केवळ जप्त केलेल्या सामग्रीचे आकारमान आणि मूल्याच्या दृष्टीकोनातूनच महत्त्वाची नसून, या कारवाईमुळे माक्रन किनारपट्टीवरून भारत, मालदीव आणि श्रीलंका या ठिकाणी पाठवण्यासाठी केल्या जाणाऱ्या अवैध तस्करीच्या मार्गांचा वापरही बंद करता येणार आहे. व्यसनाधीनतेमुळे मानवी जीवनाची हानी होण्याबरोबरच, अंमली पदार्थांच्या तस्करांच्या जाळ्याच्या माध्यमातून दहशतवाद, कट्टरवाद आणि संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांना अर्थसाहाय्य पुरवले जात असते.
S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1712703)
Visitor Counter : 265