संरक्षण मंत्रालय

हवाई दल प्रमुख फ्रान्स दौऱ्यावर

Posted On: 19 APR 2021 10:05AM by PIB Mumbai

फ्रान्स हवाई आणि अंतराळ दलाबरोबरचे वाढते द्विपक्षीय संरक्षण सहकार्य  जारी राखत हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया,पीव्हीएसएम,एव्हीएसएम,व्हीएम,एडीसी आज फ्रान्स दौऱ्यावर रवाना झाले. चीफ ऑफ एअर स्टाफ (सीएएस) भदौरिया यांच्या 19-23 एप्रिलदरम्यानच्या या दौऱ्यामुळे उभय देशातल्या हवाई दलात परस्पर संवाद  बळकट करण्यासाठीच्या  संभाव्य संधी वृद्धिंगत होणार आहेत.

 

या भेटी दरम्यान ते फ्रान्सच्या वरिष्ठ लष्करी नेतृत्वाशी चर्चा करतील आणि हवाई तळाना भेट देतील. फ्रान्सचे हवाई आणि अंतराळ दलाचे चीफ ऑफ स्टाफ जनरल फिलिप लेविने यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये भारताला भेट दिली होती त्यानंतर भदौरिया फ्रान्स दौऱ्यावर गेले आहेत. 

 

मागच्या काही काळात दोन्ही देशाच्या हवाई दलात लक्षणीय कार्यात्मक संवाद होत आहे. दोन्ही देशांच्या हवाई दलांनी द्विपक्षीय हवाई सराव प्रात्यक्षिकांची गरुडा ही मालिका, तसेच जानेवारी 2021 मध्ये जोधपुर इथे एक्स डेझर्ट नाईट 21 प्रात्यक्षिका अंतर्गत होप सराव यामध्ये सहभाग घेतला आहे. मार्च 2021 मध्ये संयुक्त अरब अमिरात हवाई दलाने इतर मित्र राष्ट्रांसमवेत आयोजित केलेल्या एक्स डेझर्ट फ्लाग युद्धाभ्यासातही भारत आणि फ्रान्सची हवाई दले सहभागी झाली होती.

 

भदौरिया यांची भेट म्हणजे  परस्पर सहकार्य अधिक वाढवण्यासाठी महत्वाचे पाऊल ठरणार आहे. 

***

Jaydevi PS/SC/CY

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1712641) Visitor Counter : 217