राष्ट्रपती कार्यालय
पुत्थाडू पिरापु, रोंगाली बिहू, नब वर्ष आणि बैसाखडी सणांच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
13 APR 2021 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या विविध भागात 14 आणि 15 एप्रिल 2021 रोजी साजरा होणार असलेल्या पुत्थाडू पिरापु, रोंगाली बिहू, नब वर्ष, व बैसाखडी या उत्सवांनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
"पुत्थाडू पिरापु, रोंगाली बिहू, नब वर्ष आणि बैसाखडीच्या पवित्र प्रसंगी मी भारतातील आणि भारताबाहेर राहणाऱ्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
नववर्षाचे हे सण देशाच्या विविध भागात नवोन्मेष, आशा आणि उत्साहाने हे सण साजरे केले जातात. आपल्या विविध आणि वैविध्यपूर्ण परंपरांचे ते प्रतिक आहेत. हे सण शेतकऱ्यांच्या अथक कष्टांप्रती आदर दर्शवतात.
या दिवशी आपण आपल्या सर्व देशवासीयांच्या जीवनात शांतता समृद्धी आणि उत्साह आणण्याची प्रतिज्ञा करूया. सर्वजण आनंदी, उत्साही राहून एकत्रितपणे नव्या उत्साहाने देशाचा विकास साधूया." असे राष्ट्रपतींनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे.
राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी इथे क्लिक करा
S.Thakur/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1711578)
आगंतुक पटल : 264