आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

गेल्या चोवीस तासांत 40 लाखांहून अधिक मात्रा देत, लसीकरण उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी भारताचे आजवरचे एकूण लसीकरण 10.85 कोटींच्या पुढे


दररोज दिल्या जाणाऱ्या लसीच्या मात्रांची सरासरी संख्या भारतात सर्वाधिक राहण्याचा शिरस्ता कायम

दररोज निदान होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत 10 राज्यांमध्ये अजूनही चढते प्रमाण

Posted On: 13 APR 2021 2:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021

लसीकरण उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी , कोविड-19 प्रतिबंधासाठी देशात आजवर केलेल्या एकूण लसीकरणाने 10.85 कोटींचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अंतरिम अहवालानुसार देशात एकूण 16,08,448 सत्रांमध्ये लसीच्या 10,85,33,085 मात्रा देण्यात आल्या आहेत.  यामध्ये पहिली मात्रा घेतलेल्या 90,33,621 इतक्या आणि दुसरी मात्रा घेतलेल्या 55,58,103 आरोग्य कर्मचाऱ्यांचा (HCW) समावेश आहे. तसेच 1,00,78,589  आघाडीवरील कोरोनायोद्धे (FLW) (पहिली मात्रा) आणि 49,19,212 आघाडीवरील कोरोनायोद्धे (दुसरी मात्रा) यांचाही यात समावेश आहे. याखेरीज, साठ वर्षांपुढील वयाचे 4,17,12,654 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 22,53,077 लाभार्थी (दुसरी मात्रा), तर 45 ते 60 वर्षे वयोगटातील 3,42,18,175 लाभार्थी (पहिली मात्रा) आणि 7,59,654 लाभार्थी (दुसरी मात्रा) हेही यात समाविष्ट आहेत.

HCWs

FLWs

Age Group 45-60 years

Over 60 years

 

Total

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

1st Dose

2nd Dose

90,33,621

55,58,103

1,00,78,589

49,19,212

3,42,18,175

7,59,654

4,17,12,654

22,53,077

10,85,33,085

देशात आजवर देण्यात आलेल्या मात्रांपैकी 60.16% मात्रा आठ राज्यांमध्ये मिळून देण्यात आलेल्या आहेत.

गेल्या चोवीस तासांत लसीच्या 40 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण मोहिमेच्या 87 व्या दिवशी (12 एप्रिल 2021), लसीच्या 40,04,521 मात्रा टोचण्यात आल्या. यापैकी 34,55,640 लाभार्थ्यांना 52,087 सत्रांमधून पहिली मात्रा आणि 5,48,881 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

Date: 12th April,2021 (Day-87)

HCWs

FLWs

45 to <60 years

Over 60 years

Total Achievement

1stDose

2ndDose

1stDose

2nd Dose

1stDose

2nd Dose

1stDose

2nd Dose

1stDose

2ndDose

20,332

33,759

81,711

1,23,456

21,71,264

81,294

11,82,333

3,10,372

34,55,640

5,48,881

 भारतात दररोज सरासरी 41,69,609 मात्रा दिल्या जात असून, दररोज दिल्या जाणाऱ्या मात्रांच्या संख्येचा विचार करता भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे.

भारतातील दररोजची नवीन रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत  देशभरात 1,61,736 नवीन रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि केरळ या दहा राज्यांमध्ये कोव्हिडच्या नवीन रुग्णसंख्येत वाढ नोंदली गेली आहे. नवीन रुग्णांपैकी 80.80% रुग्ण याच दहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 51,751 रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल उत्तरप्रदेशात 13,604 आणि छत्तीसगडमध्ये 13,576 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

खाली दाखविल्याप्रमाणे सोळा राज्यांत दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांचे प्रमाण चढेच आहे.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 12,64,698 पर्यंत पोहोचली आहे. हे प्रमाण देशातील एकूण कोविड पॉजिटीव्ह रुग्णांच्या तुलनेत 9.24% इतके आहे. गेल्या चोवीस तासांत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 63,689 इतकी निव्वळ वाढ नोंदली गेली आहे.

देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी 68.85% रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि केरळ या पाच राज्यांमध्ये आहेत. एकट्या महाराष्ट्रातच देशातील 44.78% उपचाराधीन रुग्ण आहेत.

भारतात आजवर 1,22,53,697 रुग्ण उपचारांनंतर कोरोनातून मुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तीचा राष्ट्रीय दर 89.51% इतका आहे.

गेल्या चोवीस तासांत 97,168 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

गेल्या चोवीस तासांत 879 रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोनामुळे मरण पावलेल्या नवीन रुग्णांपैकी 88.05% मृत्यू दहा राज्यात झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (258) रुग्णांचा बळी गेला. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये एका दिवसात 132 जणांचा मृत्यू झाला.

तेरा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या चोवीस तासांत कोविड-19 मुळे  एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. जम्मू आणि काश्मीर (केंद्रसशासित प्रदेश), आसाम, लडाख (केंद्रशासित प्रदेश), दमण आणि दीव व दादरा आणि नगरहवेली, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम, नागालँड, मिझोराम, मणिपूर, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, आणि अरुणाचल प्रदेश येथे चोवीस तासांत एकही कोविड मृत्यू नोंदला गेला नाही.

Jaydevi PS/J.Waishampayan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1711424) Visitor Counter : 369