कायदा आणि न्याय मंत्रालय
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी केले न्यायालयीन निर्णय आणि न्यायालयीन आदेश यांच्याशी संबधीत पोर्टलचे दूरदृश्यपद्धतीने अनावरण
Posted On:
12 APR 2021 5:43PM by PIB Mumbai
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे अध्यक्ष धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी, 9 एप्रिल 2021 न्यायालयीन निर्णय आणि न्यायालयीन आदेश यांच्याशी संबधीत पोर्टलचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अनावरण केले. मागील न्यायालयीन निर्णयांचा व आदेशांचा शोध घेणे तसेच न्यायालयीन कागदपत्रांचे ऑनलाईन फाईलिंगसाठी असणाऱ्या ई-फायलिंग 3.0 मॉड्यूल यासाठी हे पोर्टल उपयोगी पडेल. न्यायखात्याचे ,सचिव बरुन मित्रा, विविध उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती , राष्ट्रीय माहिती केंद्राच्या अध्यक्ष नीता वर्मा , सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे सदस्य असे मान्यवर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित होते. कायदे व्यवस्था बळकट व्हावी या उद्दिष्टाने पुणे येथील ई-न्यायालय प्रकल्पाच्या चमूने हे पोर्टल विकसित केले आहे.
न्यायालयीन निकाल व आदेश यांसाठीचे हे सर्च पोर्टल देशातील विविध न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निकालांचा संग्रह आहे. निकालांचा शोध घेणे व विविध शोध प्रक्रियांमधून जात अंतिम निवाडा शोधणे अश्या अनेक सुविधा या पोर्टलमुळे उपलब्ध झाल्या आहेत. या पोर्टलची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
आवश्यक ती माहिती शोधण्यासाठी संबंधित शब्द किंवा निवडा वर्ष याद्वारे माहिती मिळण्याची सुविधा असल्यामुळे निवाडा शोधण्यासाठी कोणताही कीवर्ड किंवा अनेक कीवर्ड्स वापरता येतात.
एकूण 141 कोटी निकालांपैकी आपल्याकडे 106 कोटी निकालांची माहिती असून ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे असे सांगत या पोर्टलवर आतात्यापैकी फक्त 38 कोटी निकालांची माहिती उपलब्ध असल्याचे न्यायमूर्ती चंद्रचूंड यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीमार्फत ई-फाईलिंग 3.0 मॉड्यूलमध्ये न्यायालयील कागदपत्रांचे ई—फाईलिंग करण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. या नव्या मॉड्यूलमुळे वकील किंवा पक्षकाराला खटला दाखल करण्यासाठी न्यायालयाच्या आवारात उपस्थित राहण्याची गरज उरणार नाही. न्यायालय , पक्षकार आणि वकील हे तीन वेगवेगळ्या स्थानी असतील तरी खटला दाखल करण्याची प्रक्रिया करता येईल.
खटल्याशी संबंधित न्यायालयीन भाषेतील अर्ज/ निकाल यासाठी लागणारे तयार मसुदे या पोर्टलवर असतील. त्या तयार मसूद्यामुळे वकिलांना मदत होइल आणि खटल्याच्या मांडणीसाठी लागणारा वेळ वाचेल .
या पोर्टलवर फिर्यादीला व्हिडीयो रेकॉर्डिंगच्या माध्यमातून कागदपत्रे सादर करता येतील.
या पोर्टलमुळे वकिल आणि त्यांचे सहकारी तसेच कनिष्ठ वकिलांना भागीदारीत काम करून एखाद्या ख़टल्यावर एकत्रित काम करता येईल.
हे पोर्टल पोर्टफोलियो व्यवस्थापन व खटल्यांच्या नियोजन टूलचे काम करेल ज्यामुळे संबधित खटल्याच्या बाबतीतील त्यावर त्यावर दिसून येईल.
***
Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1711177)
Visitor Counter : 402