निती आयोग

अटल इनोव्हेशन मिशन द्वारे देशभरात स्थापन झालेल्या 295 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा सीएसआयआरने घेतल्या दत्तक

Posted On: 09 APR 2021 8:45PM by PIB Mumbai

 

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेशी वृत्ती रुजवण्याच्या दिशेने महत्वाकांक्षी पाऊल टाकत सीएसआयआर, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने, देशभरातल्या 295 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा आज अधिकृतरित्या दत्तक घेतल्या आहेत. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत या प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत.

सीएसआयआरने आपल्या 36  प्रयोगशाळासह देशभरातल्या 295 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा आणि त्यांचे विद्यार्थी  दत्तक घेतले आहेत. भारतातल्या युवा नवोन्मेशीसाठी, वैज्ञानिकांकडून शिकण्याची  ही अपूर्व अशी संधी आहे. हे कल्पक विद्यार्थी त्यांची शाळा, कुटुंब आणि स्थानिकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. 

प्रत्येक अटल टिंकरिंग प्रयोगशाळेसाठी सीएसआयआर सर्वोत्तम संशोधन जगतातली मान्यवर व्यक्ती आणि वैज्ञानिक यांना सल्लागार  किंवा मार्गदर्शक गुरु म्हणून नेमणार आहे. अटल इनोव्हेशन मिशन आणि सीएसआयआर, विद्यार्थ्यांसाठी, वैज्ञानिक आणि तंत्र विषयक संकल्पना आणि संबंधित विविध विषयांवर वेबिनार मालिकाही आयोजित करणार आहे. 

कोरोना महामारीने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन आधारित नवोन्मेशाचे महत्व अधोरेखित केल्याचे अटल इनोव्हेशन मिशनचे  मिशन संचालक, नीती आयोगाचे अतिरिक्त सचिव आर रामानन यांनी या दूर दृश्य प्रणाली द्वारे बोलताना सांगितले. सीएसआयआर समवेत ही भागीदारी म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन साठी महत्वाची कामगिरी असून स्टेम संशोधनाला चालना, सार्वजनिक- खाजगी संस्थांशी नवोन्मेश सहयोग यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे.

या सहयोगामुळे अटल टिंकरिंग प्रयोगशाळेकडून युवा शालेय विद्यार्थ्याना अद्ययावत तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाशी  परिचित होण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या दृष्टीकोनाशी  हे संलग्न असून आत्मनिर्भर भारत अभियानासाठीही चालना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातल्या युवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची ही संधी म्हणजे सीएसआयआरच्या इतिहासातला महत्वाचा टप्पा असल्याचे सीएसआयआरचे महासंचालक डॉ शेखर मांडे यांनी सांगितले. 

***

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1710744) Visitor Counter : 219